चोपड्यात नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची भेट..

चोपड्यात नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची भेट.. लोकसेवा हक्क कायदा अंतर्गतविश्वास वाडे प्रतिनिधी चोपडाराज्यात लोकसेवा हक्क कायदा अंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वच्छ पारदर्शक गतिमान व सेवा मिळणाऱ्या अधिकार प्राप्त झाला आहे या लोकसेवा कायद्याची अंमलबजावणी ग्राम पातळीवर कशाप्रकारे करण्यात येत आहे या संदर्भात नाशिक विभागीय राज्य लोकसेवा हक्क आयोग आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी आज चोपडा तालुक्यात येऊन विविध विभागातील प्रमुखांची आढावा बैठक घेतली चोपडा तहसील आवारातील तलाठी मिटींग हॉल मध्ये सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आयुक्त चित्रा कुलकर्णी यांचे स्वागत तहसीलदार अनिल गावित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भरत कसोदे चोपडा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी लोकसेवा फक्त कायदा नागरिकांपर्यंत कसा पोचवेल याची जनजागृती करून लोकांना लोकसेवा हक्क कायदा काय आहे याबद्दलही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आले व अधिकाऱ्यांबद्दल कामात येणाऱ्या अडचणी यावरही अधिकाऱ्यांना सूचना यावेळी नायब तहसीलदार सचिन बांबळे पुरवठा अधिकारी देवेंद्र नेतकर सहाय्यक मुख्याधिकारी निलेश ठाकूर तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे एसटी महामंडळाचे आगार प्रमुख संदेश शिरसागर यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते यावेळी नाशिक विभागात वास्तव्य करत असणाऱ्या आदिवासी टोकरे कोळी समाज मल्हार कोळी या नागरिकांचे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून विविध समस्यांना समोरे जावे लागत आहे यासंदर्भात आयुक्त चित्रा कुलकर्णी यांच्यासमोर समस्या मांडल्या तसेच लेखी निवेदनही देण्यात आले यासंदर्भात आयुक्तांनी त्यांच्या समस्या ऐकून जाणून घेतल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!