चोपडा नगर परिषदेच्या विरोधात
भव्य मुक जन आक्रोश मोर्चा
उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांची घटनास्थळी भेट..
चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी
आज सकाळी दहा वाजता गोल मंदिर पासून मोर्चा सुरुवात झाली मेन रोड बोहारा गल्ली आझत चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक तहसील कार्यालयांत मोर्चा नेण्यात आला यावेळी तहसीलदार सह चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांना निवेदन देण्यात आले आणि प्रशासनाच्या विरोधात रोश करण्यात आला
मोर्चा मेन रोडाने जाताना गौरव राखेच्या या 27 वर्षीय युवकाच्या आगीत आंत झाल्याने
त्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा जात असताना वडिलांनी अक्षरशः हंभरडा फोडला गौरव आम्हाला सोडून कुठे गेला कुठे गेला कुठे गेला असा हंभरडा फोडला यात मोर्चेकरांना रडू कोसळले आईच्या आक्रोश मनाला लावून गेला
गेल्या तीन दिवसापूर्वी मध्यरात्री मेन रोडवरील राहुल एम्पोरियम कापड दुकानाचे मालक सुरेश भाई राखेचा यांचे संपूर्ण घर दोन्ही मजले आगीत भस्मसात झाले त्यांचा तरुण मुलगा स्वं. गौरव राखेचा वय २७ याचे आगीत जळून दुःखद निधन झाले सामान्य माणसाचा मनाला वेदना करणारी व शहारे आणणारी ही दुःखद घटना झाली असा प्रकार पुन्हा होऊ नये त्यासाठी ज्या काही त्रुट्या यावेळेस निदर्शनास आल्या चोपडा नगरपरिषद प्रशासनाचे अग्निशामक दल संपूर्णपणे आधुनिक नव्हते अग्निशामक दलाला जागेवर यायला उशीर झाला त्या नंतर शिरपुर, धरणगाव, अमळनेर ,जळगाव व अन्य शहरातील अग्निशामक दलांनी येऊन आग वीजविण्यास मदत केली चोपडा अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक साहित्य नसल्यामुळे फायरमन दीपक बडगुजर हे सुद्धा भाजले पण तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते असा प्रकारची आवृत्ती भविष्यात पुन्हा होऊ नये म्हणून शहरातील जागृत नागरिकांच्या वतीने नगरपालिका प्रशासनाने सुसज्ज व्हावे म्हणून मुक आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी महिलांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते