शहादा, डोंगरगाव, वडछिल मध्ये मे. स्वस्तिक कंपनीच्या ठेकेदाराने महसुल व वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने सरकारी पड राखिव वनविभागाच्या डोंगराचा लाखोटन गौण खनिज बेकायदेशीर काढला त्याबद्दल चौकशी करण्याची मागणी

शहादा, डोंगरगाव, वडछिल मध्ये मे. स्वस्तिक कंपनीच्या ठेकेदाराने महसुल व वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने सरकारी पड राखिव वनविभागाच्या डोंगराचा लाखोटन गौण खनिज बेकायदेशीर काढला त्याबद्दल चौकशी करण्याची मागणी.

प्रतिनिधी = नरेश शिंदे

नंदुरबार जिल्हयातील शहादा तालुक्यात डोंगरगाव वडछिल येथील सरकारी पड राखीव वनविभागाच्या गौण खनिज स्वस्तिक कंपनीच्या ठेकेदाराने महसुल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने लाखो टन गौण खनिज माती, मुरुम, दगड, बेकायदेशीर रस्त्याच्या कामासाठी एन. एस. ६१बी आमलाड मोड बोरद ते शहादा जिल्हा सिमा रोड स्टेट हायवे च्या कामावरती व इतर ठिकाणी गौण खनीज वापरण्यात आला त्याबद्दल दोषी ठेकेदारासह महसुल व वनअधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पुंडलीक तवर व कृष्णा ब्रिजलाल निकम यांनी विभागीय आयुक्त महसुल व वने नाशिक आणि जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे पुराव्यासह तक्रार देऊन मागणी केली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की,

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा डोंगरगाव वडछिल च्या हद्दीत सरकार पड राखीव वनक्षेत्र गट नं. २९०, २९३,२७९ व इतर गटात मे. स्वस्तिक इंफ्रा लॉजिक (आय) प्रा.लि. मुंबई च्या ठेकेदाराने महसुल व वनाधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो ब्रास गौण खनीज नव्हे तर लाखो टन गौण खनीज बेकायदेशीर मे. स्वस्तिक कंपनीच्या स्टोन क्रेशरसाठी वापरुन रस्ता क्र. एन. एस. ६१बी आमलाड मोड बोरद ते शहादा जिल्हा सिमा रोड स्टेट हायवे च्या कामावरती व इतर ठिकाणी दिवसा ढवळ्या रात्रं दिवस माती, मुरुम, दगड सरळ सरळ वापरण्यात आला तरी या गौण खनीज चोरी संदर्भात सामाजिक कार्यकर्ता नंदकुमार पुंडलीक तवर व कृष्णा ब्रिजलाल निकम यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा २००५ अंतर्गत हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्या ठिकाणी गौण खनिज चोरी संदर्भात संपुर्ण पुराव्यासह तक्रार मा. विभागीय आयुक्त, महसुल व वने, नाशिक मा.गमे साहेब व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे तक्रार करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात गौण खनिज काढतांना मे. स्वस्तिक कंपनीच्या ठेकेदारांनी व महसुल वनअधिकाऱ्यांनी कोणतीच पूर्व परवानगी केंद्र व राज्य शासनाची घेतलेली नाही. तसेच शहादा तालुका हा पूर्वीपासून रिझर्व फॉरेस्ट असतांना भारतीय वन कायदा १९२७ प्रमाणे डोंगरगाव वडछिल चा सहकारी पड जमीन गट नं. २९०,२९३, २७९, व इतर डोंगराचे जमीनी वनविभागाच्या मालकीची असतांना हा एवढ्या मोठ्या प्रमाणात गौणखनीज उचललाच कसा? हा पण चौकशीचा भाग आहे. असे असतांना ही जमीन आदिवासी शेतकऱ्यांना भोगवटादार २ म्हणून पोट भरण्यासठी वाटप करण्यात आली आहे. त्या जमीनीचा शेतकऱ्यांना ज्या प्रयोजनासाठी दिली आहे. त्या प्रयोजनाचा वापर न करता व्यापारी तत्वावर गौण खनीज हे स्वस्तिक कंपनीला उत्खनन कसे करू दिले हे संपुर्ण प्रकरणाची तात्काळ कायदेशीर चौकशी करुन ठेकेदारासह महसुल व वनाधिकारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक नंदकुमार पुंडलीक तवर व कृष्णा ब्रिजलाल निकम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!