नंदुरबार येथे भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्यावतीने नंदुरबार शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक कमांडर इन चीफ महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशान्वये माता रमाई यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने समता सैनिक दलाचे पथसंंचलन घेण्यात आले असून, याबाबतीत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्टॉफ ऑफिसर मुंबई एस के भंडारे यांनी सांगितले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1927 साली समता सैनिक दलाची स्थापना केली, चवदार तळ्याचा सत्याग्रह केला त्याच्या तयारीसाठी मिल्ट्रीमध्ये ज्याप्रमाणे ड्रिल शिकवले जाते, त्याप्रमाणे समता सैनिक दलालाही ड्रिल शिकवण्याचं काम सुरू असल्याचे सांगितले, तसेच समाजामध्ये जे काही लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत, त्याबाबत जनजागृती निर्माण करण्याचे काम या माध्यमातून करीत असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी नंदुरबार शहरातील जुन्या पोलीस कवायत मैदानावर समता सैनिक दलाचे ध्वजारोहण समता सैनिक दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्टॉफ ऑफिसर मुंबई एस के भंडारे यांच्याहस्ते करण्यात आले, व नंदुरबार शहरातील नेहरू पुतळामार्गे, नवीन नगरपालिका, शास्त्री मार्केट, स्मारक चौक, सोनार गल्ली, जळका बाजार मार्गे, साक्री नाक्यावरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात हे पथसंचलन घेण्यात आले, या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली, यावेळी नंदुरबार जिल्हा समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद आल्हाट, समता सैनिक दलाचे नाशिक विभागीय सचिव के वाय सुरवाडे, असिस्टंट लेफ्टनंट जनरल हेडकॉटर सचिव प्रशिक्षक डी एम आचार्य, महाराष्ट्र राज्य मेजर जनरल उपाध्यक्ष प्रशिक्षक व्हि डि हिवराळे, समता सैनिक दलाचे नाशिक पश्चिमचे अध्यक्ष भिकाजी कांबळे, पश्चिम जळगावचे अध्यक्ष डी के संसारे, जळगाव पूर्वचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव, अहमदनगरचे अध्यक्ष सुगंध इंगळे, मनमाड समता सैनिक दलाचे कमांडर गौतम कर्डक, नाशिक पूर्व समता सैनिक दलाचे कर्नल हिरामण वानखेडे, समता सैनिक दल जळगावचे करणार कर्नल युवराज नरवाडे, जळगावचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य सिद्धार्थ सोनवणे तसेच भारतीय बौद्ध महासभा नंदुरबार शाखेचे सर्व पदाधिकारी व समता सैनिक दलाचे सैनिक या पतसंचालनात सहभागी झाले होते, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे नंदुरबार शाखेचे पदाधिकारी संघटक भरत निकुंभे, नामदेव चक्रे, जिल्हा सचिव डॉक्टर अर्जुन निकुंभे, अशोक मगरे, रमेश शिरसाट, मगन भामरे यांच्या सह समता सैनिक सुनंदा शिरसाठ,सुनिता वाघ,लिलाबाई भामरे,केवलबाई वाघ, वंदना निकुंभे,सुदंरा आल्हाट,सारिका कूवर,रत्नाप्रभा बर्डे सविता मेश्राम,सुनिता अहिरे, संध्या पिंपळे, वैशाली बोराळे ,सत्वशिला गोस्वामी, निर्मला पानपाटील,आदींनी संचलनात सहभाग, घेतला होता. संचलनानंतर इदिरा गांधी मंगल कार्यालय येथे कार्यक्रम चा समारोप करण्यात आला. यावेळीा सूत्रसंचालन नामदेव चक्रे यांनी सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन भरत निकुंभे माजी कोषाध्यक्ष यांनी केले.यावेळी सविता मेश्राम व रत्नाप्रभा बर्रडे यांनीै मनोगत व्यक्त केले यावेळी समता सैनिक दलाचे महिला व पुरुष उपस्थित होते.
Related Posts
नागपुर ची प्रणिमित्र चैताली भस्मे यांनी आपला वाढदिवस केला गरजू निराधार वृद्ध महिलांसोबत
*नागपुर ची प्रणिमित्र चैताली भस्मे यांनी आपला वाढदिवस केला गरजू निराधार वृद्ध महिलांसोबत*आजकल च्या जगात वाढदिवास साजरा करने म्हणजे पैशाची…
आदिवासी मुलांना जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण;लड्डू पाटील व सहका-यांवर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल**आरोपींना अटक करण्याची आदिवासी संघटनांची मागणी*
*आदिवासी मुलांना जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण;लड्डू पाटील व सहका-यांवर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल**आरोपींना अटक करण्याची आदिवासी संघटनांची मागणी*शहादा:शहादा तालुक्यातील औरंगपूर…
स्वो.वि. संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जयंती निमित्त वकृत्व स्पर्धा*
*स्वो.वि. संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जयंती निमित्त वकृत्व स्पर्धा*( मालपुर प्रतिनिधी गोपाल कोळी ) मालपुर तालुका शिंदखेडा…