वसमार येथे शिवजयंती उत्साहात साजरी:
नेर:- साक्री तालुक्यातील वसमार येथे शिवतीर्थ युवा प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. व महाआरती करून अभिषेक करण्यात आला. येथील जिल्हा परिषद मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले,यावेळी शिवाजी महाराजांच्या चौथर्याला लोकनियुक्त सरपंच समाधान येळीस,यांच्या वतीने स्टील रेलिंग करण्यात आली,उपसरपंच भटू नेरे,यांच्या वतीने महाराजांना छत्री बसवण्यात आली. व येथील माध्यमिक शिक्षक पंकज नेरे, यांच्याकडून महाराजांना आकर्षित अशी लाइटिंग देण्यात आली.या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थ शिवप्रेमी मोठे संख्येने उपस्थित होते. यावेळी गावामध्ये शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली.