नेर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी; गावातून मिरवणूक व रॅली काढत केला जल्लोष: नेर: धुळे तालुक्यातील नेर येथील सालाबादाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य दिव्य अशी शिवजन्मोत्सव सोहळा मिरवणूक व मोटरसायकल रॅली काढून उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच सार्वजनिक शिवजयंती उत्सव हा नेर ग्रामस्थांकडून यावर्षी मोठ्या जल्लोषाने साजरी करण्यात आला. तसेच तरुण ग्रामस्थांकडून देखील यावर्षी आयोजन केले होते. नेर येथील गांधी चौक येथे सकाळी ९:०० वाजता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार टाकून पूजा करण्यात आली.व मोठ्या जल्लोषात मोटरसायकल रॅली ही पूर्ण गावातून काढण्यात आली तसेच सायंकाळी ६:०० वाजता मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक ही देखील बँड वाजंत्री व डीजेच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्ताने नेर-म्हसदी फाटा येथून मिरवणुकीला सुरुवात होत रायवट शाळा,महात्मा फुले चौक,मेन रोड, सावित्रीबाई फुले चौक,दुर्गामाता चौक,गांधी चौक,जैन गल्ली,आंबेडकर चौक,क्रांती चौक येथे समाप्त करण्यात आली.यावेळी मिरवणुकीमध्ये बंधू-भगिनी ज्येष्ठ नागरिक नेर ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते व मिरवणूक ही मोठ्या उत्साहात पार पाडत जल्लोषात साजरी करण्यात आली.
Related Posts
सारंगखेडा पूलाच्या दुरावस्थेची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी भारत राष्ट्र समिती पक्षातर्फे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन सादर.
सारंगखेडा पूलाच्या दुरावस्थेची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी भारत राष्ट्र समिती पक्षातर्फे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन सादर.शहादा,दि.17(का.प्र.) शहादा-दोंडाईचा…
शंकरराव खलाणे यांचा कापडणे येथील माळी समाजातर्फे सत्कार
*नेर:* *शंकरराव खलाणे यांचा कापडणे येथील माळी समाजातर्फे सत्कार:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथील उद्योजक तथा धुळे जिल्हा माळी समाजाचे…
नेर येथे गांधी चौक फेवर ब्लॉक कामाचे भूमिपूजन
नेर येथे गांधी चौक फेवर ब्लॉक कामाचे भूमिपूजन नेर: धुळे तालुक्यातील नेर येथे गांधी चौक फेवर ब्लॉक कामाचे भूमिपूजन करण्यात…