टरबूजचा ट्रक उलटला… एक जागीच मृत्यू तर चार गंभीर जखमी

टरबूजचा ट्रक उलटला… एक जागीच मृत्यू तर चार गंभीर जखमी…

चोपडा तालुक्यांतील वराड गावाच्या शेत शिवारात टरबूज ट्रक मध्ये भरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ट्रक मध्ये टरबूज भरत असताना ट्रक अचानक एका बाजूला कलंटल्याने ट्रक जवळ उभा असलेला एक जण ट्रक खाली दबल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे तर चार मजूर गंभीर स्वरूपात जखमी झाल्याचे समजते.
सदर घटनेचे वृत्त कळताच उपजिल्हा रुग्णालयाची रूग्णवाहिका व स्टाफ घटनास्थळी पोहोचले व तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणले आणि तात्काळ उपचारास सुरूवात केली. मात्र जखमींच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घातल्याने काही काळ रूग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांना पाचारण करण्यात आल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली.
साजिद महंमद बागवान वय ३५ रा सानेगुरुजी वसाहत चोपडा हा मालक अमजद खान तमीझ खान पठान रा मुस्तफा कॉलनी चोपडा यांचे ट्रक क्र.MH-18 BA-3486 वर क्लिनर म्हणुन काम करीत होता. तसेच सदर गाडीवर चालक म्हणुन शेख जाकीर शेख सलीम रा पटवेअली चोपडा असल्याचे समजते.
साजीद बागवान हा वराड शिवारात टरबुज भरण्यासाठी ट्रक चालका सोबत गेला होता. गाडी टरबुज ने भरुन चोपडा कडे येत असतांना ट्रक हि मातीचे रस्त्यावरुन स्लिप होवुन पल्टी झाली. त्यात क्लिनर साजीद बागवान हा गाडी खाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.वराड शिवारातील शेख समील शेख ईस्माईल बागवान यांचे शेताचे बांधालगत असलेल्या कच्या रस्त्यावर (गाड रस्ता ) जवळ सदर घटना घडली आहे. पोलीसांनी क्रेन मागवुन सदर क्रेनच्या साह्याने ट्रकला बाजुला सारुन कॅबिनच्या खाली दबलेला साजीद बागवान यास बाहेर काढले.सदर ट्रक मध्ये बसलेल्या इतर ६ मजुर देखील जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सूरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!