गणू महाराज यांना द गोल्डन ह्युमन राइट्स अवॉर्ड प्रधान

गणू महाराज यांना द गोल्डन ह्युमन राइट्स अवॉर्ड प्रधान: नेर: साक्री तालुक्यातील म्हसदी येथील आज दिनांक २५/०२/२०२३ रोजी गव्हर्मेंट ऑफ दिल्ली यांचा द गोल्डन ह्युमन राइट्स अवॉर्ड राष्ट्रीय समाजसेवा रत्न दीपक रत्नाकर दीक्षित उर्फ गणू महाराज यांना प्रधान करण्यात आला.तसेच म्हसदी गावातील व परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.तसेच गणू महाराज गोरगरिबांना नेहमीच अन्नदान करत असतात व मदत देखील करतात तसेच कोरोना काळात देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी गावोगावी जाऊन गोरगरीब तसेच एसटी महामंडळाचा संप सुरू असताना कंडक्टर व एसटी ड्रायव्हर यांना देखील संसार उपयोगी वस्तू किराणा किट वाटप करण्यात आलेली होती.तसेच उल्लेखनीय कौतुकास्पद सामाजिक कार्यकरतात त्यांची कामाची दखल घेऊन त्यांना गव्हर्मेंट ऑफ दिल्ली यांचा द गोल्डन ह्युमन राइट्स अवॉर्ड राष्ट्रीय समाजसेवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच त्यांचे मनस्वी अभिनंदन अशीच त्यांचे उत्तरा उत्तर प्रगती होत राहो आमची प्रार्थना केली व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पुरस्कार स्वीकारताना प्रकाश देवरे,संकेत कुलकर्णी,कृष्णा कुलकर्णी,तुषार कुलकर्णी,जगदीश जुवेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!