श्री सूर्यकिरण फाउंडेशन व मुक्ती फाउंडेशन तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन*

*श्री सूर्यकिरण फाउंडेशन व मुक्ती फाउंडेशन तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन* जळगाव- श्री सूर्यकिरण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत धांडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सूर्यकिरण फाउंडेशन व मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरातील जुना खेडी रोड , ज्ञानदेव नगर परिसरातील स्थानीक नागरिकांसाठी व गरजू रुग्णांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या शिबीरात इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे रक्तदान व रक्तगट तपासणी, रक्ताचे प्रमाण तपासणी, नाशिक येथील एच.सी.जी. मानवता कॅन्सर हॉस्पिटल तर्फे कर्क रोग निदान तपासणी व मार्गदर्शन, आर.एल. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे हृदयरोग, रक्तदाब , मधुमेह व जनरल तपासणी, जिल्हा सामान्य रुग्णालय नेत्र विभागातर्फे मोतीबिंदू तपासणी, निमजाई फाउंडेशन तर्फे स्वयंरोजगार मार्गदर्शन, वाय.आर.जी. केअर संस्थेतर्फे कोरोना लसीकरण बूस्टर डोस अशा विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकीतून घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरास जळगावचे आमदार राजुमामा भोळे ,जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटिल , शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , शिवसेनेच्या महिला महानगर प्रमुख गायत्री सोनवणे, डॉ. सुषमा चौधरी, शितल पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, श्री सूर्यकिरण फौंडेशनचे अध्यक्ष प्रशांत धांडे, डॉ.मेहुल पटेल, शिवमुद्राचे बिपिन मराठे, मानवता कॅन्सर हॉस्पिटलचे डेप्युटी मॅनेजर राहुल सूर्यवंशी व डॉक्टरांची टीम, आर. एल. मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे स्वप्निल पालवे व डॉक्टरांची टीम आदी मान्यवरांनी बहुमूल्य योगदान दिले. या भव्य मोफत आरोग्य शिबिराचा ज्ञानदेव नगर परिसरातील शेकडो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लाभ घेतला . तसेच याप्रकारे निस्वार्थ वृत्तीने आरोग्य सेवा करणे म्हणजेच साक्षात परमेश्वराची सेवा करणे होय अशा शब्दात अनेकांनी या सेवा कार्याचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!