धुळे विभागातील शहादा आगारात जळगाव जिल्हा एसटी कर्मचारी सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा परिवर्तन पॅनल तर्फे धूमधडाक्यात प्रचाराचा शुभारंभ
जळगांव जिल्हा एसटी कर्मचारी सहकारी पतपेढ़ी लि. जळगाव सोसायटीच्या सन 2017-2022 या कालावधीच्या संचालक मंडळाचा कालावधी संपला असून आता सन 2022 ते 2027 या कालावधीच्या नवीन संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून या निवडणुकीत एसटी कष्टकरी जनसंघाने परिवर्तन पॅनलने निवडणूक लढवून विजयाचा निर्धार पक्का केला आहे. त्याचा प्रचाराचा शुभारंभ बहुसंख्य कामगारांची सभा घेऊन आज शहादा आगारात करण्यात आला उपस्थित सर्व उमेदवारांनी प्रचंड मताधिक्याने निवडून आणावयाचे सभासदांनाआव्हान केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एसटी कष्टकरी जनसंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष शिंदे, राज्य सरचिटणीस राजेश पानपाटिल, धुळे विभागीय अध्यक्ष रूपेंद्र तावडे, विभागीय सचिव दिपक नागपुरे, विभागीय पदाधिकारी वसंत कोळी, संजय नंदवाळकर, देवेंद्र पानपाटिल, फरीद पठान व इतर, शहादा आगार अध्यक्ष नंदशेखर बाविस्कर, सचिव चंपालाल डुडवे, कार्याध्यक्ष प्रकाश धनगर, खजिनदार मगन पावरा, ज्येष्ठ सल्लागार दिलीप पाटिल, संजय पाटिल, ब्रिजलाल पाटिल, राजेंद्र पानपाटिल, विजय धनगर, भरत डुडवे, चालक वाहक प्रतिनिधि भिमा मराठे, बापू कोळी, कैलास येडवे, संतोष आगळे, राजेंद्र साळुंखे, बबलू पठाण, सुधाकर कानवटे, किशोर ठाकरे, एम.व्ही. आडगाळे, विजय गोल्हार, सखाराम ठाकरे, योगेश पाटिल, राजेंद्र देवरे, रमेश बडोदे, उदय नेरकर, गोरख पेंढारकर, महेंद्र पाटिल, सुरेश भदाने, प्रणिल ठाकरे, घनश्याम चव्हाण, अनिल ठाकरे, यांत्रिकी कार्यशाळेतील पि.आर. मायेनकर, एच.एम. ब्राह्मणे, जे.पी. सावळे, जे.एम.खान व ईतर चालक-वाहक, लिपिक तसेच यांत्रिकी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन वसंत कोळी यांनी केले व आभार प्रकाश धनगर यांनी मानले.