नेर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांना “सुषमा स्वराज अवार्ड”देऊन ८ मार्च ला सन्मान करण्यात येणार
*
नेर: धुळे तालुक्यातील नेर येथे दि.८ मार्च रोजी नेर ता.जि.धुळे येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे जिल्हा यांच्या वतीने धुळे जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कृषी व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २० महिलांना ” सुषमा स्वराज अवार्ड” स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
भाजपा कडून माजी विदेश मंत्री व भाजपा नेत्या कै.सुषमा स्वराज यांच्या नावाने “सुषमा स्वराज अवार्ड”अभियान देशभर राबविण्यात येणार आहे.त्यानुसार हा जिल्ह्यास्तरी पुरस्कार वितरण कार्यक्रम नेर येथे होत आहे.केद्रांचे माजी संरक्षणराज्यमंत्री व खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या व धुळे जि.प.च्या अध्यक्षा सौ.अश्विनी पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार असून. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जि प च्या माजी सभापती धरती देवरे, सभापती संजिवनी सिसोदे, माजी जि.प.उपाध्यक्षा कुसुम निकम, माजी सभापती मंगला पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनभाऊ चौधरी, भाजपा जिल्हा अध्यक्ष नारायण पाटील हे उपस्थित राहणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक भाजपा जिल्हा अध्यक्षा सौ सविता पगारे, जिल्हाउपध्यक्षा व पुरस्कार वितरण प्रभारी सौ.मनिषा खलाणे यांनी सांगितले.