विकास इंग्लिश मीडियम स्कूल, कहाटूळ येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन
*दिनांक 8 मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटूळ येथे मोठ्या उत्साहात बहुसंख्य महिला माता पालकांच्या उपस्थितीत महिला दिवस साजरा करण्यात आला*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र कहाटूळचे आरोग्य सेविका श्रीमती कविता राठोड हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे प्रथम नागरिक सरपंच सुनिता ताई सिकंदर भिल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढरे चे आरोग्य सेविका श्रीमती एस यु खवले , एम एस ई बी सब स्टेशन कहाटूळचे महिला कर्मचारी श्रीमती प्रणिता मेश्राम , निजरे आजी , श्रीमती विद्या पाटील , श्रीमती कल्पना पाटील , श्रीमती रत्ना पाटील , श्रीमती माधुरी पाटील हे लाभले* .
*कार्यक्रमाची सुरुवात प्रथम महिला शिक्षिका , विद्येची आराध्य दैवत माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून झाली . कार्यक्रम दरम्यान महिला दिनानिमित्ताने शाळकरी मुलांनी आपली मते मांडली . त्याचप्रमाणे उपस्थित शिक्षक वर्ग सौ रेणुका पाटील , कल्पना गूलाले, कु माहेश्वरी पाटील ,सौ मनीषा माळी त्यांनी आपल्या मनोगत मधून महिलांच्या जीवनात आलेल्या बदलांच्या व साधलेली प्रगतीच्या उजाळा दिला . माता पालकामार्फत श्रीमती ज्योती पाटील यांनी महिला जीवनात येत असलेल्या संकटांची माहिती देत .जीवन प्रवास कसा खडतर असून त्यावर मात कसे करून महिला जीवन जगत असते या विषयी माहिती दिली .श्रीमती वैशाली पाटील यांनी स्त्री चे अनेक रूपाचे वर्णन करून त्त्याग मुर्ती स्त्री कशी असते या विषयी मत मांडले .तसेच श्रीमती प्रणीता मेश्राम यांनी प्रत्त्येक क्षेत्रात स्त्री ने प्रगती साधून पुरुषांप्रमाणे विकास साधला आहे .एम एस ई बी कर्मचारी म्हणून त्यांना आलेल्या अनुभवाचा त्यांनी उजाळा दिला* .
*अध्यक्षीय भाषणात श्रीमती राठोड यांनी मुलांच्या शालेय जीवनात आई चे स्थान काय असते त्यांची जबाबदारी काय असते ते पटवून दिले .मुलांच्या आरोग्याबद्दल काय काळजी घ्यावी या बाबत माहिती दिली* .
*त्या नंतर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातुण काही वेळ स्वतः साठी द्यावा म्हणून व थोडा विरंगुळा व्हावा म्हणून काही मनोरंजनाचे क्रीडा स्पर्धा घेण्यात आले .त्यात संगीत खुर्ची , पासिन्ग द बॉल , लिंबू चमचा .या स्पर्धेत सर्वच माता पालकांनी सहभाग नोंदविला व आनंद व्यक्त केला .या स्पर्धा मधून प्रथम तीन विजेत्या काढण्यात आले* .
*संगीत खुर्ची मध्ये प्रथम क्रमांकश्रीमती सीमा गणेश पाटील , द्वितीय क्रमांक श्रीमती मनीषा किशोर जाधव ,तृतिय क्रमांक श्रीमती दिपाली गणेश सोनवणे व उत्तेजनार्थ श्रीमती भावना मनोहर पाटील हे होते.पासिन्ग द बॉल या स्पर्धेत प्रथम श्रीमती माधुरी यादव माळी , द्वितीय क्रमांक श्रीमती मनीषा किशोर जाधव ,तृतिय क्रमांक दुर्गा वसंत निझरे व उत्तेजनार्थ श्रीमती योगीता भगवान पाटील हे आले . लिंबू चमचा स्पर्धेत प्रथम क्रमांक माधुरी यादव माळी , द्वितीय क्रमांक आशा प्रकाश चित्रकथे ,तृतिय क्रमांक वैशाली सतीश पाटील व उत्तेजनार्थ श्रीमती प्रणीता निलेश मेश्राम हे आले .*
*कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रिन्सिपल श्री एम के. गवळे यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु .प्रगती जगदाळे व कु भारती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती मनीषा माळी यांनी केले*.
*कार्यक्रम यशश्वी तेसाठी सौ रेणुका पाटील , कल्पना गूलाले, कु माहेश्वरी पाटील , ज्योती पाटील , महिमा पाटील यांनी मेहनत घेतली* .