सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज तिथीनुसार जयंती अभिवादन

सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज तिथीनुसार जयंती अभिवादन…
दिनांक 10 मार्च 2023 वार शुक्रवार रोजी सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा यांच्या तर्फे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे तळोदा प्रखंड विशेष संपर्कप्रमुख मा.श्री.महेंद्र मामा कलाल,प्रमुख अतिथी एल.आय.सी अधिकारी मा.चि. राहुल भारतसा सोनवणे, प्रमुख वक्ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.श्री. धनंजय सूर्यवंशी सर, सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे हे उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.चि.राहुल भारत सोनवणे हे म्हणालेत की,छत्रपती शिवाजी महाराजांचे सूक्ष्म नियोजन हे आपल्या अंगिकृत केले पाहिजे महाराज ज्यावेळेस मोहिमेला जायचे तर जाताना त्याकाळी देखील पर्यावरणाच्या विचार करायचे त्याप्रमाणे आपणही पर्यावरणाला संवर्धन केले पाहिजे असे ते म्हणालेत.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.श्री.धनंजय सूर्यवंशी सर हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना डोक्यावरून न मिरवता त्यांचे विचार आपल्या हृदयात व आपल्या आचरण्यात उतरवले पाहिजे. आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तक वाचून ते आपल्या अंगीकृत करावे असे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित इंजि.श्री.जितेंद्र कलाल,श्री. विजयरावजी सोनवणे,श्री. दिनेश जावरे, श्री. छोटू नाना कलाल, श्री देवेंद्र कलाल, श्री हरीश भाऊ कलाल,श्री.मेकू सक्सेना,श्री.अनुराग सक्सेना,श्री.अमित सक्सेना,श्री.श्रावण सक्सेना,श्री.सोनेला सक्सेना,श्री.शंकर प्रजापती,श्री.अरुण सक्सेना, चि.हितेश कलाल हे उपस्थित होते
या कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावे उपाध्यक्ष श्री.सागर पाटील सचिव श्रीमती.कविता कलाल कार्याध्यक्ष श्री.संतोष चौधरी संचालक श्री.अतुल पाटील, श्री.नकुल ठाकरे,श्री.अनिल नाईक, चि.पवन सोनवणे, चि.हितेश दिलीप कलाल यांनी केले.
या कार्यक्रमाला सूत्रसंचालन सेवाभावे प्रतिष्ठान अध्यक्ष मा.चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी केले तर आभार कृपासिंधू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.देवेंद्र कलाल यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!