क.डों.म.पा.डोंबिवली शास्रीनगर सामान्य ॠग्णालयातील महिला कर्मचा-यांना जनजागृती सेवा समितीकडुन”सन्मानपत्र”प्रदान करुन सत्कार –

क.डों.म.पा.डोंबिवली शास्रीनगर सामान्य ॠग्णालयातील महिला कर्मचा-यांना जनजागृती सेवा समितीकडुन”सन्मानपत्र”प्रदान करुन सत्कार ———————————————————–डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)-८मार्च हा दिवस जागतिक महिला दिन.हा दिन महिलांच्या सामाजिक,आरोग्य,आर्थिक,वैद्यकीय,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी केला जातो.तसे पाहिले तर महिला या वर्षाचे३६५दिवस कार्यरतच असतात.परंतु८मार्च रोजी महिला दिन म्हणून कोतुक व अभिनंदन केले जाते.८मार्चला महिला दिन साजरा झाला.१०मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथि व तिथीनुसार शिवजंयती या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्यावतीने डोंबिवली येथील क.डो.म.पा.शास्रीनगर सामान्य ॠग्णालयातील महिला कर्मचा-यांना”सन्मानपत्र”प्रदान करुन सत्कार करण्यात आला.डाॅ.दिपा शुक्ल,मंगला सोनावणे,रोहिणी मानकर,मधुरा फाटक,वैशाली देशपांडे,सुवर्णा थोरात,रेखा पिंगुळकर या ॠग्णालयातील कर्मचा-यांना तसेच विविध क्षेत्रात कार्य करणा-या श्रुती उरणकर,स्वप्नाली पांचाळ,संजिवनी चव्हाण,मिनल गावडे,वंदना जाधव,सविता ठाकुर,सुनिता मिश्रा,स्वाती माळवदे,अश्विनी मुजुमदार,श्रृतिका परब,आशा कदम याना जनजागृतीचे पदाधिकारी खजिनदार दत्ता कडुलकर,सहखजिनदार सौ.श्रुती उरणकर,सौ.मिनल गावडे यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आली.डाॅ.दिपा शुक्ल,दत्ता कडुलकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.सन्मानपत्र सोहळा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार दत्ता कडुलकर व सहखजिनदार सौ.श्रुती उरणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!