शहादा शहरात खुलेआम गुटखा व गांजाविक्री गावोगावी सुळसुळाट; कारवाईच्या नावानं चांगभलं….!
शहादा मेनरोड वरील बाजारात कपड्याच्या दुकानात गांजाची सरासर विक्री; प्रशासनाची डोळे झाक
गल्लोगल्ली सुगंधित तंबाखूंची दुकाने
गुटखाबंदी नावालाच; संबंधित विभागाकडून कारवाईची अपेक्षा
प्रतिनिधि = नरेश शिंदे
राज्यात शासनाने गुटखाबंदी केली आहे. गुटक्याच्या साठा विक्री करण्यास सह सुगंधित तंबाखू विक्रीवर प्रतिबंध लावलेला आहे. तरी देखील शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात खुलेआम सुगंधी तंबाखूची विक्री होत आहे काही ठिकाणी गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री छुप्या पद्धतीने केली जात आहे तालुक्यातील गल्लोगल्ली सुगंधित तंबाखूची विक्री व खरेदी होत आहे महाराष्ट्र व मध्यप्रदेश महामार्गावरून सरासर पणे गुटख्याची वाहतूक सुरू असते जिल्ह्यात अन्य व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून बोटावर मोजण्या इतक्या कारवाई होत आहेत. किरकोळ कारवाया होत असल्या तरी शहर व ग्रामीण भागातील पानटपऱ्या व हॉटेलमध्ये खुलेआम होणारी गुटखा विक्री बरेच काही सांगून जाणारी आहे. त्यामुळे गुटखाबंदी सध्या तरी कागदपत्रे असल्याचे दिसत आहे. काही गुटखा विक्रेत्यांनी शासनाच्या गुटखाबंदीच्या लाभ घेत गुटक्याची किंमत वाढवली आहे गुटख्याची पुडी कंपनीच्या किमतीपेक्षा अधिक दराने विकली जात आहे तीन ते पाच रुपयाची पुडी सहा ते दहा रुपयात विकली जाते. विक्री करणारे गुटक्याच्या साठा अन्य ठिकाणी करतात गुटखा खाणाऱ्यांना गुटखा विक्रीची ठिकाणे सापडतात मात्र पोलिसांनी किंवा अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्याच्या पत्ता का लागत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहेत तंबाखू ही आरोग्यास हानिकारक असून यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे गुटक्याच्या दुष्परिणामामुळे अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहेत.
पान टपऱ्या व छोट्या-मोठ्यांपर्यंत वितरणाबाबत कमालीची गुप्तता संभ्रम निर्माण करणारी आहे शहरासह ग्रामीण भागात गुटख्याच्या व्यवहारातून लाखो रुपयाची उलाढाल होत असते मात्र हा व्यवहार चालतो कसा हे जाणून संबंधित विभागाने कारवाई करावी ही अशी अपेक्षा व्यक्त होत आहे