नेर: म्हसदी येथे पायी दिंडीचे गणू महाराजांनी केले स्वागत
नेर: साक्री तालुक्यातील म्हसदी येथील कुलदैवत धनदाई देवीच्या दर्शनासाठी गेल्या अनेक वर्षापासून गिरणारे (ता. देवळा) येथील भाविक पायी दिंडीने देवीचा जयजयकार करीत येतात. काल या दिंडीचे मंदिर परिसरात आगमन होताच धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळाच्या वतीने अध्यक्ष सुभाष देवरे व सचिव महेंद्र देवरे यांनी दिंडीतील भाविकांचे स्वागत केले. त्यानंतर
भाविकांनी मंदिर परिसरात टाळ व मृदूगांच्या आवाजात देवीचा जयजयकार केला. त्यानंतर येथील साईभक्त तथा ग्राम पुरोहित गणू महाराज दीक्षित यांनी गिरणारे ते म्हसदीपर्यंत पायी आलेल्या दिंडीचे मंदिरावर स्वागत केले. दिंडीतील तीनशे भाविकांची गणू महाराजांनी महाप्रसादाची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी गणू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा व
काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कीर्तनानंतर गणू महाराजांनी प्रसाद वाटप केला. त्यामुळे दिंडीतील भाविकांनी गणू महाराजांचे कौतुक केले.. यावेळी आबासाहेब देवरे, राजेंद्र देवरे, कृणाल भदाणे, प्रमोद निकम, नितीन भदाणे, नितीन शर्मा, निलेश कुलकर्णी समाधान देवरे, किशोर देवरे, अशोक देवरे, विजय अहिरे आदींनी सहकार्य केले. ✍🏻 नेर प्रतिनिधी दिलीप साळुंखे