चौगाव-अजनाळे दरम्यान गोरक्षकांनी २६ गाई घेऊन जाणारा ट्रक पकडला; नेर येथील जय बजरंग मित्र मंडळ गो रक्षकांची धडक कारवाई:
नेर:- धुळे तालुक्यातील नेर येथील आद्यगोरक्षक श्रीशिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलन नेर धुळे विभाग व जय बजरंग मित्र मंडळ गो रक्षक यांनी दिनांक.१८/०३/२०२३ रोजी आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास गो रक्षक यांना माहिती मिळाली की दहिवेल हून मालेगांव येथे कत्तलीसाठी २६ गाई घेऊन जाणारा ट्रक क्रमांक.४१.जी.७२४३ सहा चक्का ट्रक गाई घेऊन जात असताना गो रक्षकांनी पाठलाग करून चौगांव-अजनाळे दरम्यान ट्रक पकडून धडक कारवाई केली असुन व कसाई पासून गो मातेची सुटका करण्यात आली आहे.तसेच
गोरक्षक यांनी ट्रकमधील सर्व गाई उतरून त्यांना दुसर्या वाहनाने धुळे येथील खान्देश गोशाळेत रवाना करण्यात आल्या आहेत यात,गायीची निर्दयीपणे वाहतूक केल्यामुळे गोरक्षकांनी संताप व्यक्त केला येत आहे. तसेच
एकाच ट्रक मध्ये देखील २६ गाई कोंबून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न अखेर फसला आणि गो रक्षकाना ट्रक पकडुन धडक कारवाई करण्यात आली आहे.यावेळी नेर येथील जय बजरंग मित्र मंडळ गो रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ✍🏻 नेर प्रतिनिधि दिलीप साळुंखे