सन २०२१ च्या पोलीस भरतीत एका घटकामध्ये एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेल्या उमेदवारांना अपात्र करणेबाबत

दि. १५/०३/२०२३ प्रति, मा.पोलीस अधीक्षक सो. नंदुरबार जिल्हा. यांच्या सेवेशी….. अर्जदार – १) गणेश नथ्थू कोळी,वय- 23 वर्ष. २) सुनिल विठ्ठल कोळी ,वय-28 वर्ष , धंदा- शिक्षण. ३) निलेश श्रीराम देवरे,वय- 28 वर्ष धंदा- शिक्षण. ४) राहुल रमेश शिंदे, वय- 28 वर्ष,धंदा – शिक्षण. ५) विशाल राजू सनेर , वय- 26 वर्ष, धंदा- शिक्षण. सर्व रा. मंदाणे ता. शहादा जि. नंदुरबार. विषय – सन २०२१ च्या पोलीस भरतीत एका घटकामध्ये एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेल्या उमेदवारांना अपात्र करणेबाबत…. महोदय, आम्ही उपरोक्त विषयान्वये विनंतीपूर्व तक्रारी अर्ज सादर करतो की, 1.आम्ही वरील पत्त्यावरील कायमचे रहिवासी आहोत. आम्ही सर्व अर्जदार सन 2021 च्या पोलीस भरती मध्ये पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर केला होता व आहे. मैदानी परीक्षा दिली. लेखी परीक्षा बाकी आहे. परंतु आमच्या मते सदरच्या पोलीस भरतीत काही उमेदवारांनी एका पेक्षा जास्त अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे स्थानिक व होतकरु मुलांचे नुकसान झालेले आहे. प्रत्येक फॉर्म भरलेल्या उमेदवारांचे नाव व फॉर्म भरलेल्या अर्जाची आय. डी तपासून /छाननी करुन त्याची सत्यता पडताळून पाहावी. 2.तरी मा. पोलीस अधीक्षक सो. नंदुरबार यांना विनंती की, सदर भरती प्रक्रियेत ज्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत. अशा उमेदवारांना अपात्र घोषित करुन त्यांचे अर्ज तात्काळ रद्द करण्यात यावेयावे ही विनंती असे. नंदुरबार . दि. 15/03/2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!