कणकवली येथील एस्.एम्.हायस्कुलच्या१९७६च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा उत्साहात साजरा ———————————————————–मालवण(गुरुनाथ तिरपणकर)-“अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती”या गतकाळाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कणकवली येथील एस्.एम्.हायस्कुलच्या१९७६च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा शनिवार१८व रविवार १९रोजी तोंडवली-तळाशील,मालवण येथील’गाज’बीच हाॅलीडे रिसाॅर्ट येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.सर्व माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींच्या भेटीने-संवादाने मैत्रीचे पाश अधिकच दृढ झाले.आपआपल्या आयुष्यातील व करियर मधील चढ-उतार यांचे अनुभव कथन करत सर्वांनीच आपली मन मोकळी केली.आणि मागील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना कुणाचाही मोठेपणा नव्हता.उलट जीवनात घडलेले किस्से,गमती-जमती,विनोद हेच होते.मैत्रीच्या ओढीने मुंबईवरुनही मित्र-मैत्रिणी आले होते.याच स्नेहमेळ्यात आपलेच वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगणी,निस्वार्थी कवी मनाचे मित्र डाॅ.अनिल कांबळी यांच्या”इष्टक”या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले.कवी डाॅ.अनिल कांबळी यांनी गेल्या४५वर्षातील आपल्या निस्वार्थी वैद्यकीय सेवेतील प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा अनुभव सांगितला. आणि त्यातीलच काही घटना आपल्या काव्यसंग्रहात शब्दबद्ध केल्या.काही कवितांच वाचनही झाल.तसेच रात्रीच्या गप्पा-टप्पा,सकाळी-संध्याकाळी समुद्रकिनारी फेरफटका मारण्याचा अनुभव हा आल्हाददायक व संस्मरणीय असाच होता.बोटीने सफर करताना संगम,कवडा राॅक,शिंपले पाॅईंट,डाॅल्फीन पाॅईंट ही स्थळे पहाण्याचा योग आला.समृद्र सफारीचा हा अनुभव अविस्मरणीय असाच होता.या स्नेहमेळ्याच्या मधुर आठवणी दीर्घकाळ प्रत्येकाच्या मनात रेंगाळत रहातील.स्नेहमेळा यशस्वी करण्यासाठी नंदु आळवे,संजय पाध्ये,शेखर ओरसकर,प्रसाद देसाई,भारती वर्दम तसेच’गाज’रिसाॅर्ट चे संजय केळुस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Related Posts
आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी जननायक बिरसा मुंडा एकलव्य समशेर सिंग पारधी,छ. शिवाजी महाराज. व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा अभिवादन करण्यात आले
आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी जननायक बिरसा मुंडा एकलव्य समशेर सिंग पारधी,छ. शिवाजी महाराज. व…
नेर ते नांद्रे रस्तालगत मोठे लवण पाईप मोरी बांधणीसाठी भूमीपुजन;जि.प.सदस्य आनंदराव पाटील
नेर ते नांद्रे रस्तालगत मोठे लवण पाईप मोरी बांधणीसाठी भूमीपुजन;जि.प.सदस्य आनंदराव पाटील: नेर: धुळे तालुक्यातील नेर ते नांद्रे रस्तालगत मोठे…
ग्रामरोजगार सेवक संदिप निकम यांना ग्रामपंचायत कार्यालयात मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत धनराज सूर्यवंशी कडून जीवे ठारमारण्याची धमकी
महाळपुर ता शिंदखेडा जि धुळे येथील ग्रामरोजगार सेवक संदिप निकम यांना ग्रामपंचायत कार्यालयात मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत…