धुळ्याचे अर्जुन गिरधर महाले B.A.llb परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण;मा.पोलिस अधिक्षक बारकुंडसाहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव:
नेर: धुळे येथील कोळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते,तथा अखिल भारतीय कोळी समाज संघटना,नवी दिल्ली,धुळे जिल्हाध्यक्ष गिरधरअप्पा महाले यांचे कनिष्ठ चिरंजीव अर्जुन गिरधर महाले हा B.A.llb परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने त्याचा यथोचित गौरव होत आहे.धुळे येथील
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल लॉ कॉलेज येथे धुळे पोलीस अधीक्षक मा.बारकुंड साहेब यांच्याहस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रतिभा चौधरी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल लॉ कॉलेजचे चेअरमन महेंद्र निळे, प्राचार्य विजय बहिरम आदी मान्यवर उपस्थित होते.
उपरोक्त यशाबद्दल अर्जून महाले याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे तसेच सर्व कोळी समाज बांधवांकडून व अखिल भारतीय कोळी समाज यांच्याकडून देखील अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या व कौतुक करण्यात आले.