विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ येथे वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
आज दिनांक 27/3/2023रोजी विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ येथे वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला . कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले संस्थेचे संचालक श्री दत्तू नथू पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास इंग्लिश मीडियम स्कूल समन्वयिका आदरणीय ताई साहेब प्रीती पाटील , संस्थेचे संचालक आदरणीयश्री विठ्ठल नथू पाटील, कहाटुळ गावाचे सरपंच सौ सुनिता ताई ठाकरे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री यादव राव माळी , माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही बी पाटील सर व पर्यवेक्षक श्री मनोज गोसावी सर हे लाभले .
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .
*शैक्षणिक वर्ष 2022 23 मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले . या स्पर्धांमधून प्रथम तीन विजेते काढण्यात आले होते . विविध स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , गणपती मेकिंग स्पर्धा , राखी कॉम्पिटिशन , संगीत खुर्ची , प्लीज कॉम्पिटिशन , हॅन्ड रायटिंग कॉम्पिटिशन स्पर्धा घेण्यात आल्या . तसेच स्पोर्ट्स इव्हेंट्स मध्ये लेमन स्पून कॉम्पिटिशन , रनिंग कॉम्पिटिशन , लॉंग जंप कॉम्पिटिशन , थ्री लेग कॉम्पिटिशन इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या . या विविध स्पर्धांमधून जिंकलेला विजेत्यांना प्रमाणपत्र शैक्षणिक साहित्य देऊन त्याच्या गुण गौरव करण्यात आला*.
*स्टुडन्ट ऑफ द इयर म्हणून मानसी विजय इंडाईत यांची निवड झाली .तसेच पेरेंट्स ऑफ द इयर मध्ये श्रीमती ज्योती सतीश पाटील यांची निवड झाली . तसेच टीचर ऑफ द इयर मध्ये मिस . भारती पुरुषोत्तम पाटील यांची निवड करण्यात आली . आतापर्यंतच्या सर्वच कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासात सर्वच शिक्षक वृंदांचा , माता पालकांचा मोलाचा वाटा आहे* .
*कार्यक्रमात प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री एम के गवळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनीषा माळी , रेणुका पाटील , भारती पाटील , महिमा पाटील , प्रगती जगदाळे , माहेश्वरी पाटील , कल्पना गुलाले यांनी मेहनत घेतली* .