भडगांव (खैरवे) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिति गठित
अध्यक्षपदी रमेश पानपाटिल, उपाध्यक्षपदी भुरेसिंग भील व सचिवपदी कृष्णा गवळे यांची सर्वानुमते निवड
शहादा तालुक्यातील भडगांव येथील ब्ल्यू टायगर चौकात ब्ल्यू टायगर ग्रुपचे अध्यक्ष संजूदादा पानपाटिल यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
सभेस प्रमुख मान्यवर शहादा पंचायत समिति सदस्य प्रतिनिधि देवेंद्र पानपाटिल, पोलिस पाटील धनराज पानपाटिल, माजी ग्रामपंचायत सदस्य मल्हारी बापू चित्ते, माजी उपसरपंच भिमादादा पानपाटिल, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पानपाटिल, ज्येष्ठ सल्लागार पंढरीनाथ निकुंबे, विजय निकुंबे, व अमृत सोनवणे तसेच ब्ल्यू टायगर ग्रुप व एकलव्य टायगर फोर्स चे सर्व सदस्य व ईतर बहुसंख्य भिम अनुयायी यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिति अध्यक्षपदी रमेश पानपाटिल, उपाध्यक्ष भुरेसिंग भील, कार्याध्यक्ष कांतिलाल पानपाटिल, सचिव कृष्णा गवळे, खजिनदार देविदास पानपाटिल, सह खजिनदार योगेश पानपाटिल, गणेश पानपाटिल, संपर्क प्रमुख सुनिल भिल व महारु भिल, संघटक राजेंद्र पानपाटिल, अनिल भिल, किरण पवार, गोपाल निकुंबे, हर्षल कोळी, प्रसिध्दि प्रमुख विजय पानपाटिल, समाधान भील,
सभेत कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली त्यात सकाळी ०८:०० वाजता महामानवाच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन, ०९:०० वाजता संपूर्ण गावांत मिरवणूक, १२:०० वाजता स्नेहभोजन, सायंकाळी ०४:०० वाजता रक्तदान शिबिर व रात्री ०८:०० वाजता महामानवांच्या गौरव गितांचा सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेस युवराज पानपाटिल, जगत पानपाटिल, रतिलाल पानपाटिल, जतन पानपाटिल, सुरेश पानपाटील, शामराव पानपाटिल, रविंद्र पानपाटिल, विनायक पानपाटील, दिपक पानपाटिल, महेंद्र गवळे, जगन पानपाटिल, अजय पानपाटिल, दिनेश पानपाटिल आदि समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन ब्ल्यू टायगर ग्रुपचे सचिव सचिन पानपाटिल यांनी तर आभार ब्ल्यू टायगर ग्रुप उपाध्यक्ष मनोज पानपाटिल यांनी मानले.