गावात स्वातंञ्यानंतर पहिल्यांदा विज पोहचल्यामुळे ग्रामस्थ उत्साही दिसून येत आहे.

भुषा गावात स्वातंञ्यानंतर पहिल्यांदा विज पोहचल्यामुळे ग्रामस्थ उत्साही दिसून येत आहे.

दि.09/04/2023 रोजी धडगांव तालुक्यातील नर्मदा नदी किनारी अतिदुर्गम आदिवासी डोंगराळ भागात व धडगांव पासून ४० किलोमीटर अंतरावर वसलेले भुषा या गावात भारत स्वातंञ्यानंतर ७२ वर्षात प्रथम महाराष्र्ट राज्य विज वितरण महामंडळ विभागा मार्फत प्रथम गावात विज पोहचली. भुषा हे गाव काही वर्षा पासून रस्ते, पाणी, आरोग्या, शिक्षण, विज आदी सोयी- सुविधा पासून वंचित असले तरी भुषा गावाकडे स्थानिक प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधीनी लक्ष दिले नसल्यामुळे गाव विकासापासून कोसधुर राहिले. गावातील युवक आधुनिक धावत्या युगात उच्च शिक्षण घेतल्यामुळे गावचे विकास होण्याच सुरवात झालेली दिसून येत.
भुषा गावातील खुटालीपाडा-१, खुटालीपाडा-२, हकतारा, विहिरपाडा, विमानतळपाडा, ओकायापाडा, भुषा पाॅंईट आदी पाड्यावरील ३० ते ४० लाभार्थ्यांना विजचे लाभ होईल.
डि.पी ( ट्रान्सफाॅंमर ) विद्युत रोहिञ चे
उदघाटना वेळी उपस्थिती मा.कुशाल कुल्ला पावरा सरपंच भुषा, जाड्या पावरा सरपंच माळ, लाला पावरा, नटवर पांडुरंग पावरा, दारख्या पावरा, फोपा पावरा कारभारी, मेरसिंग पावरा, बोठड्या मालसिंग पावरा, किसन अरविंद पावरा, कसा पावरा, पंडित पावरा, जेमा पावरा, गुमान खर्डे, युवराज पावरा, सुरत्या पावरा, किर्ता(भिरता)पावरा वायरमन आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

किसन पावरा धडगांव प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!