तावखेडा येथील वाल्मीकऋषी विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन
नेर: ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा (प्र.न) ता. शिंदखेडा जि. धुळे येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय मुख्याध्यापिका श्रीमती पी.पी. महिरे- वाघ यांनी आपल्या मनोगतातून महापुरुषांच्या विचारांची आजच्या पिढीला गरज आहे असे मत व्यक्त केले.
राज्य आदर्श शिक्षक श्री. एन.पी. भिलाने यांनी थोर समाज सुधारक, पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी करणारे, आद्य स्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना तत्कालीन समाज व्यवस्थेशी करावा लागलेला संघर्ष आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. एस. एस. पाटील यांनी क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले व सावित्रीमाई यांनी समाज हितासाठी उपयोगी पडणारे सर्वात महत्त्वाच्या शिक्षणासाठी केलेला संघर्ष आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. सी. झेड. कुवर, राज्य आदर्श कलाशिक्षक श्री. सावंत ए.के, इंग्रजी विषयाच्या उपक्रमाशील शिक्षका श्रीम. मंगला दौलत कुवर, श्री. पी.एच. लांडगे ,श्री नितीन पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे जेष्ठ लिपिक श्री जितेंद्र एन राजपूत श्री दिलीप पाटील व श्री डॉ. निकम यांनी विशेष मेहनत घेतली.