सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अंतर्गत मंजूर रक्कम विद्यार्थ्यांना वितरीत करण्यासाठीं मुख्याध्यापकांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात आला होता. मात्र जि.प.शाळा जावदे येथील प्रभारी मुख्याध्यापक यांच्यावर 2 लाख 86 हजार रक्कमेचा संशयित अपहार केल्याचे चौकशीत आढळून आले असून त्यांना सेवेतून निलंबित करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिला.
सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अंतर्गत मंजूर रक्कम विद्यार्थ्यांना वितरीत करण्यासाठीं संबंधित शाळांचे मुख्याध्यापकांच्या खात्यावर झेड.पी.एफ. एम.एस ऑनलाईन मंजूर निधी वर्ग करण्यात आलेला आहे.सदर निधी शाळेतील इयत्ता निहाय अनुज्ञेय विद्यार्थी अथवा त्यांचे त्यांच्या पालक यांच्या बँक खात्यावर आर टी जी एस प्रणालीद्वारे निधी वर्ग करण्याचे निर्देश दिलेले होते.मात्र उपसरपंच व पालक जावदे त.ह. ता. शहादा यांच्या तक्रारी नुसार गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, शहादा यांनी जि.प.शाळा जावदे त.ह. ता.शहादा येथे भेट दिली असता रजेसिंग कधु खर्डे प्रभारी हे मुख्याध्यापक हे दि. 13 फेब्रुवारी 2023 ते दि. 9 मार्च 2023 पर्यंत गैरहजर असल्याचे आढळुन आले. श्री. खर्डे यांचे गैरहजेरीमुळे आर्थिक स्वरुपाचे दप्तर पहायला मिळाले नाही.
त्यामुळे आर्थिक निर्धी कशा प्रकारे खर्च करण्यात आला हे समजु शकले नाही. तथापी शाळा व्यवस्थापन समिती /उपसरपंच व पालक यांनी दिलेल्या तक्रारी नुसार व बॅकस्टेटमेंटनुसार दि. 14 ऑक्टो. 2019 धनादेश क्र. 41168 रु.98 दि. 4 जुलै 2022 धनादेश क्र. 41179 रु.1 लाख 11 हजार व दि. 13 फेब्रुवारी 2023 धनादेश क्र. 41174 रु.77 हजार असे एकुण रक्कम 2 लाख 86 हजार रक्कमेचा संशयित अपहार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शहादा यांनी दि. 31 मार्च 2023 अन्वये चौकशी करुन अहवाल सादर केल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी जि.प. शाळा जावदे येथील प्रभारी मुख्याध्यापक रजेसिंग खर्डे त.ह. ता.शहादा यांना जि. प. सेवेतून निलंबित केलेले आहे.
तसेच त्यांच्या विरुध्द लवकरच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिला.