घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती जनजागृती सेवा समितीच्या वतीने साजरी ———————————————————-बदलापुर-महाराष्टात सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या जनजागृती सेवा समितीच्या वतीने घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी अंजलीनगर,हेंद्रेपाडा,बदलापुर(पश्चिम)येथे मर्यादित प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.सर्व प्रथम माहेरवाशिण संस्थेच्या संचालिका प्रभाताई शिर्के,सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे सचिव राजेंद्र नरसाळे,सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दिलीप शिरसाट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.त्यानंतर सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दिलीप शिरसाट,सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे सचिव राजेंद्र नरसाळे यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होऊन मानाचा मुजरा केला,अभिवादन केले.सर्व प्रमुख पाहुण्यांचे संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आभार पत्र व गुलाब पुष देऊन स्वागत केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंधाली तिरपणकर,मेघा भालेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
Related Posts
एका तरुणाचा गोळीबाराने मृत्यू शहादा तालुक्यातील मलगाव येथील घटना
एका तरुणाचा गोळीबाराने मृत्यू शहादा तालुक्यातील मलगाव येथील घटना सविस्तर वृत्त असे की शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या वादातून भाव…
दोंडाईचा एस.टी. आगारातुन शहादा बस दररोज सकाळी १०.३० ते ११ वाजे दरम्यान सुरू होणे बाबत*
*दोंडाईचा एस.टी. आगारातुन शहादा बस दररोज सकाळी १०.३० ते ११ वाजे दरम्यान सुरू होणे बाबत*( प्रतिनिधी गोपाल कोळी ) निमगुळ…
माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सखोल चौकशी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी | माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी*
*माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सखोल चौकशी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी | माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची…