समाज प्रबोधनातून महामानव,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रध्दांजली,जयंतीनिमित्त “पालकत्वाच्या समस्या”या विषयावर विद्यार्थी चळवळीचे प्रणेते दिपकजी राणे यांचे समुपदेशन –

समाज प्रबोधनातून महामानव,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रध्दांजली,जयंतीनिमित्त “पालकत्वाच्या समस्या”या विषयावर विद्यार्थी चळवळीचे प्रणेते दिपकजी राणे यांचे समुपदेशन ———————————————————बदलापुर-

रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ- बदलापूर , यांच्याद्वारे घटनाकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुले व पालक यांच्या बदलत्या संबंधावर ” पालकत्वाच्या समस्या ” या विषयावर संवाद सत्र आयोजित केले होते . संवेदनशील पालकांच्या उपस्थितीत सत्र यशस्वीरित्या संपन्न झाले .

मंडळाचे अध्यक्ष श्री .चंद्रकांत पाटील यांनी “संविधानाची उद्देशिका” व ” सिंधूरत्ने ” हे ग्रंथ भेट देऊन मार्गदर्शक श्री दिपकजी राणे यांचे स्वागत केले .

उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना , विद्यार्थी विकास चळवळीचे प्रणेते श्री. दिपकजी राणे यांनी पालकांशी विविध समस्यांवर चर्चा करून त्यांचे समुपदेशन केले . मोबाईलचा दुष्परिणाम , अति व्यस्त राहणारे पालक , घरातील आजी-आजोबा, जेष्ठ व्यक्ती यांचे महत्त्व , इत्यादी विविध विषयांवर बोलताना पालकांनी स्वतःचे आदर्श उदाहरण मुलांसमोर ठेवूनच मुलांना घडवायला हवे, असा विचार व्यक्त केला .
मुलांना घडवण्यात आईची खूप मोठी भूमिका आहे , या जबाबदारीचे भान सर्व माता भगिनींनी ठेवायलाच हवे. त्याच वेळी वडिलांनी सुद्धा आपले बोलणे, आपल्या सवयी , यावर योग्य ते नियंत्रण ठेवायलाच हवे . असे आग्रही मत त्यांनी व्यक्त केले .

कार्यक्रमाला उपस्थित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री. महेश सावंत यांनी बदलत्या आर्थिक – सामाजिक व्यवस्थे सोबत मुले व पालक यांच्या तुटत जाणारा संवाद ही समाजासमोरील अत्यंत गंभीर समस्या असल्याचे सांगितले . याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पालकांनी स्वतःच पुढाकार घेऊन अशा समुपदेशनाच्या माध्यमातून मुलांच्या व पालकांच्या मधील ही दरी भरून काढायला पाहिजे असा सल्ला उपस्थित पालकांना दिला .

याप्रसंगी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. विजय सावंत यांनी , मुलांचे खरे गुरू त्यांचे आई वडील व त्यांची परिस्थिती असते असे सांगून मुलाना परिस्थितीची जाणीव लक्षात आणून देणे आवश्यक आहे असे सांगितले. आवश्यक असणार्‍या विषयांवर चर्चा सत्र ठेवण्याची मंडळाकडे सुचना केल्यास त्या अशी चर्चासत्रे ठेवण्यात येतील पण त्यामध्ये सर्वानी सहभाग घ्यावा असे सूचित केले

कार्यक्रमास उपस्थित पालकांचे आभार मानताना मंडळाचे सचिव श्री. मंगेश कदम यांनी मंडळाद्वारे चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची उपस्थितांना माहिती करून दिली आणि भविष्यातही असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम मंडळाद्वारे आयोजित केले जातील याची ग्वाही दिली .

सदर कार्यक्रमास सिंधुदुर्ग सहकारी बँकेचे व्यवस्थापक श्री. दिपक ठुकरुल , तेंडुलकर एंटरप्राइजेस चे मालक आनंद तेंडुलकर, ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपनकर , मंडळाचे सदस्य एकनाथ राणे , सुनील सदडेकर , दिपक वायंगणकर , सौ. सुवर्णा कदम , समाजसेविका पुजा इंदुलकर इत्यादी ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!