पुसनद ग्राम पंचायतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्यां जयंती निमित्त प्रतिमा पूजन
पुसनद येथे दिनांक 14 रोजी सकाळी 10: 00 वा.ग्राम पंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले,यावेळी युवा सरपंच अनिल एकनाथ आगळे व माजी सरपंच प्रवीण चौधरी,पोलीस पाटील कृष्णा कोळी हे अध्यक्ष स्थानी असून प्रतिमा पुष्पहार सदस्य शरद पाटील यांनी केले,तर शरद आगळे यांनी श्रीफळ फोडून कार्यक्रम संपन केला.यावेळी ग्राम रोजगार सेवक अशोक पिंपळे,सदस्य दिलीप सोनवणे,पंडित शेमले,किसन महिरे,काळू ठाकरे ,सिदु ईशी,जितू आगळे,भगवान गिरासे, चूनीलाल पाटील,गजमल आगळे ,शिवाजी पाटील,गणेश शिरसाठ, व वंचितचे युवा जिल्हा महासचिव प्रकाश आगळे उपस्थित होते.