*जुने भदाणे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी:

*जुने भदाणे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी: *नेर:* धुळे तालुक्यातील जुने भदाणे येथे भारतीय राज्यघटनेचे घटनाकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्था भदाणे ग्रा.पंचायतीचे सरपंचा सौ. जिजाबाई भीमराव कर्नर, उपसरपंच श्री विठ्ठल महारु पाटील, सचिव सौ. शेवाळे मॅडम, पोलीस पाटील व पदाधिकारी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले, यावेळी भदाणे गावातील राज्यस्तरिय वक्तृत्व पुरस्कार प्राप्त युवावक्ते प्रफुल्ल तोताराम माळी यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले या महामानावाच्या कार्य कर्तृत्वाबद्दल मांडलेले विचार सर्व उपस्थितांचे आकर्षण ठरले, गावातील जेष्ठ बौद्ध मंडळी श्री परशराम मोहिते, श्री कौतिक मोहिते, श्री मंगेश मोहिते सर, समाधान अहिरे, खुशाल मोहिते यांनी पुढाकार घेत सर्व समाजातील वरिष्ठ मंडळीशी विचार विनिमय करून असे ठरवले की मागीलवर्षी जो अनुचित प्रकार घडला त्यावेळी झालेला वाद – विवाद बाजूला ठेऊन या वर्षी महामानवांना वंदन करू व एकत्र येऊन जयंती साजरा करूया, समता, समानता, स्वातंत्र्य, न्याय ही त्यांनी दिलेली शिकवण आज जोपसण्याची गरज आहे असे विचार मांडले व सर्वानी त्यास होकार दिला, कार्यक्रमाला राजकीय, शैक्षणिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते, त्यात नेर गावाचे माजी सरपंच मा. शंकरराव खलाने साहेब, भदाणे येथील कैलास आण्णा कोळी, प्रभाकर जिभाऊ माळी, दिलीप बा.पाटील, तुकाराम दादा माळी, अरविंद माळी, दिपक पाटील, चुडामन बोरसे, भूपेंद्र खलाने, गौतम वाघ,भिकाआप्पा भदाणे, सुरज महानर, भूषण पाटील, जगन्नाथ माळी, दिनेश माळी, श्रीकांत खलाने, ग्रा.पं.सदस्य भगवान कोळी, मोहन मालचे, हितेश पाटील, अंगणवाडी सेविका सौ.संगीता महाले, सौ. मीनाबाई अहिरे, आशाताई सौ मीनाबाई खैरनार आणि सर्व बौद्ध बांधव व बघीनी उपस्थित होते, श्री मोहिते सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे आयोजन पंचशील मित्रमंडळाने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!