वाघाच्या कातडीची तस्करी करणारी टोळी गजाआड
प्रतिनिधी = शहादा
मिळालेल्या गुप्त बातमीनुसार गुजरात राज्यातून वाघाची कातडी, नखे विक्री होणार असल्याची बातमी नुसार शहादा बसस्टैंड येथे ३ आरोपींना वाघाची कातडी व नखे सहित दिनांक २९/०४/२०२३ रोजी रात्री १०.३० वाजता अटक करण्यात आले. पुढील चौकशी अंती ज्या आरोपीला सदर वाघाचे अवयव विक्री केले जाणार होते, त्या आरोपीला देखील त्याच वेळी अटक करण्यात आली.
सदर कार्यवाही मध्ये एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी नामे १) रामचंद्र गोविंदा जाधव, वय ४० वर्ष, रा. मोराने, ता. सटाणा जि. नाशिक २) रामा सायसिंग उमरे, वय २५ वर्ष, रा. चिपी, ता. सटाणा जि. नाशिक ३) सुखीराम महारु भदाणे, वय ४५ वर्ष, रा. बंधारपाडा, ता. साक्री जि. धुळे ४) चंदन शमनलाल डेटवाणी, वय २७ वर्ष रा. शहादा जि. नंदुरबार वरील आरोपीकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले.
१) वन्यप्राणी वाघाची कातडी – १ नग
२) वाघाची नखे २० नग
वरीलप्रमाणे आरोपी असून आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमा अंतर्गत वन गुन्हा क्र. ०१ / २०२३ दिनांक २९/०४ / २०२३ अन्वये वन गुन्हा नोंदवण्यात आला. सदर आरोपींना शहादा कोर्टात हजर केले असता दिनांक ०४/०५/२०२३ पर्यंत वन कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरु आहे. सदर कार्यवाही मध्ये श्री कृष्णा भवर, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय साळुंके, सहा. वनसंरक्षक अक्राणी, श्री आशुतोष मेढे वनक्षेत्रपाल शहादा, श्री एस. एन. पाटील वनपाल दरा, श्री डी. बी. जमदाळे वनपाल जयनगर, वनरक्षक श्री एस. जी मुकाडे, श्री ए. एन तावडे, श्री आर. जी. वसावे, श्री एफ. एन. वसावे, श्री बालाजी इंगळे, श्री दीपक पाटील, वाहन चालक श्री नइम मिर्जा, विक्रम पानपाटील यांनी सदर कार्यवाही मध्ये सहभाग नोंदवून यशस्वीरित्या आरोपींना जेलबंद करून वन्यप्राणी वाघाचे अवयव हस्तगत करून यशस्वी कार्यवाही केली आहे. सदर वन गुन्ह्याच्या अनुषंगाने श्री एस. डी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल श्री आशुतोष मेढे पुढील तपास करत आहे.