व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांच्या विविध प्रलंभित मागण्यांसाठी करण्यात आले धरणे आंदोलन
नेर: व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांच्या मागण्यांसाठी आज संपूर्ण राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण तसेच धुळे शहरात देखील हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे,
पत्रकारांच्या विकासासाठी स्वतंत्र मंडळाची स्थापना करून त्यास भरीव निधी देण्यात यावा त्याचबरोबर पत्रकारांना घर मिळवून देण्यासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून देण्यात यावा, वृत्तपत्रांमध्ये छापून येणाऱ्या जाहिरातीवर लावण्यात येणारा जीएसटी रद्द करण्यात यावा, कोरोना काळात मृत पावलेल्या पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात यावे, पत्रकारितेत पाच वर्ष पूर्ण झालेल्या पत्रकार बांधवांना सरसकट अधिकृती पत्रक देण्यात यावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिकांना मारक ठरत असून लघु दैनिकांना देखील ब वर्ग मध्यमवर्गीय दैनिकांप्रमाणेच जाहिरात देण्यात व सप्ताहिकांना देखील त्याच प्रकारे जाहिराती देण्यात याव्यात या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले असून आपल्या मागण्यांसाठी तहसील अधिकारी त्याचबरोबर जिल्हाधिकार्यांना याबाबतचे निवेदन देखील देण्यात आले आहे, धुळे जिल्ह्याचे वाईस ऑफ मेडिया या पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले असून प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन ठोस निर्णय न घेतल्यास यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील संघटनेतर्फे देण्यात आला आहे.