विश्व हिंदू परिषदचे अखिल भारतीय महामंत्री श्री मिलिंद जी परांडे यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे चर्चा सत्र संपन्न
नंदुरबार जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तींची चर्चासत्र संपन्न झाले.सुरुवातीला सूत्रसंचालन विश्व हिंदू परिषद नंदुरबार जिल्हा सहमंत्री श्री.अजयभाऊ कासार यांनी केले. सुरुवातीला भारत माता पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मंचावर उपस्थित विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय महामंत्री श्री.मिलिंद जी परांडे, विश्व हिंदू परिषद नंदुरबार जिल्हा मंत्री श्री.विजयराव सोनवणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री श्री.विजयराव सोनवणे यांनी केले व विषय मांडणी विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय महामंत्री श्री.मिलिंद जी परांडे यांनी केले.ते म्हणाले की, विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय स्तरावरून सेवा-संस्कार-सुरक्षा या विषयावर काम करत आहे. आपला समाज-जातीने विभागला जात आहे असं होता कामा नये समस्त हिंदू समाज संघटित झाला पाहिजे. यावेळी या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत मंत्री श्री.योगेश्वरी गर्गे जी, जळगाव विभाग मंत्री श्री शांताराम पाटील, रा.स्व.संघचे जिल्हा कार्यवाह ॲड.संजय पुराणिक, वि.हिं.प प्रांत समरसता प्रमुख श्री.पुरुषोत्तम काळे,जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव चौधरी,जिल्हा विशेष संपर्कप्रमुख श्री.गोपाल बुनकर,जिल्हा समरसता प्रमुख,श्री.छोटू नाना कलाल हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी नियोजन प्रखंड मंत्री श्री.महेंद्रभाऊ सोनी,श्री.नित्यानंद भाऊ सोनार,श्री.कपिल अग्रवाल,श्री.कल्याण पाटील, मंथन सोनी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे समारोप प्रखंड मंत्री श्री.महेंद्र सोनी यांनी पसायदान व जयघोष घेतले कार्यक्रमाची सांगता झाली.