जिद्द आणि चिकाटीतून शेतातील कामे करून नेहा मोरे झाली मुंबई पोलीस…

जिद्द आणि चिकाटीतून शेतातील कामे करून नेहा मोरे झाली मुंबई पोलीस…..

तालुका चाळीसगाव पिलखोड या खेडेगावातून नेहा शामराव मोरे(कोळी)जिद्द आणि चिकाटी, मेहनतीच्या जोरावर झाली मुंबई पोलीस . नेहाचे वडील शामराव मोरे हे ट्रॅक्टर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर आई सुनीताबाई ही शेतात मजुरी करून घराला हातभार लावते. या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा .नेहा त्यांची मोठी मुलगी . आई-वडिलांना सतत कष्ट करत बघत असताना. नेहमी नेहा म्हणायची मला माझ्या आई-वडिलांचे कष्ट दूर करायचे आहेत.आणि त्या जिद्दीने तिने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. दहावीपर्यंतचे शिक्षण तिने पिलखोड येथील. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत पूर्ण केले. आणि महाविद्यालयीन शिक्षण तिने रा.वी. कॉलेज चाळीसगाव येथे पूर्ण केले. तिच्या नोकरीच्या स्वप्नांनी आणि जिद्दीने ति नाशिक येथे आली पुढील शिक्षणासाठी आली. कधी वडापाव तर कधी डब्बा तर कधी जे मिळेल ते खाऊन दिवस काढू लागली आणि विविध प्रकारच्या लहान मोठ्या स्पर्धा देण्याची तयारी ठेवली .त्यातच,मुंबई पोलीस परीक्षेचा फॉर्म भरला. त्यासोबत बीएसएफ चा फॉर्म भरला. दिवस-रात्र अभ्यास, मैदानी सराव करत होती. हेच बघून की माझ्या आई वडिलांचे कष्ट मी थांबवणार. शेवटी काल निकाल लागला नेहा ही उत्तम मार्कांनी मुंबई पोलीस परीक्षा पास झाली. तिचं स्वप्न पूर्ण झालं. आई-वडिलांचा आनंद गगनाला भिडला. यासोबतच ती चार दिवसांपूर्वी बीएसएफ चा निकाल लागला .त्यात सुद्धा ती अतिशय उत्तम मार्काने पास होऊन तिचे सिलेक्शन झाले होते. जेव्हाही बातमी गावात पसरली की, नेहा मोरेचा सिलेक्शन झालं तर सर्व गावकऱ्यांनी नेहा हिची मिरवणूक काढली. अजून काही विद्यार्थी झाले त्यांची देखील मिरवणूक काढली. आणि मोठा सत्कार केला. नेहाला विचारल्यावर नेहा म्हणाली मला अजून इथे थांबायचं नाहीये ,माझी अजून स्वप्न आहेत. अधिकारी होण्याचे ते देखील मी पूर्ण करणार आहे. मी माझ्या समाजाचे, माझ्या नातेवाईकांचे तसेच माझ्या गुरुजनांचे, पाठीशी खंबीर उभे राहणारे माझे आई-वडील, माझे काका काकू ,माझे भाऊ-बहीण. ज्यांनी ज्यांनी मला वेळोवेळी शैक्षणिक सहाय्य केले. त्यांची देखील मी कायम ऋणी राहील. आणि म्हणाली मुलींनी आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे, आर्थिक सक्षम असतील तर मुली सर्व प्रसंगाला तोंड देऊ शकतात त्यामुळे मुलींनी जिद्दीने अभ्यास केला पाहिजे आणि आपली स्वप्न पूर्ण केली पाहिजे. मला देशसेवेची संधी मिळाली ती मी प्रामाणिक करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!