दोन महिन्यांपासून बंद असलेली बस खंडलाय मार्गे आज पासून सुरू: राहुल गुलाबराव भदाणे
नेर: धुळे तालुक्यातील खंडलाय ते धुळे दोन महिन्यापासून बंद असलेली बस आज पासून सुरू करण्यात आली आहे.तसेच भडगाव येथे बस देखील रात्री मुक्कामने येणार तर सकाळी बस ही खंडलाय मार्गे धुळेकडे जाणार तसेच खंडलाय परिसरातील बहुसंख्य नागरिक भाजीपाला विक्रेते, दुधव्यवसायिक व शालेय विद्यार्थ्यांचे नियमित कुसुंबा व धुळे जाणे सुरू असते गैरसोय होत असल्याने मोठे नुकसान होत होते.तसेच खंडलायसह परिसरातील नागरिकांना देखील खंडलाय ते धुळे ही बससेवा चालु झाल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बस सुरु करावी यासाठी काल धुळे येथील आगार प्रमुख पंकज देवरे साहेब यांना खंडलाय गावातील सामजिक कार्यकरते राहुल गुलाबराव भदाणे यांनी समक्ष भेटुन सांगितले की भडगाव बस ही खंडलाय मार्गे सुरु करावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यातुन मार्ग काढुन भडगाव हून खंडलाय मार्गे धुळे सकाळी बससेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. यातून मागणीला यश मिळाले व आज दिनांक १९/०५/२०२३ रोजी बससेवा मागणी प्रमाणे चालु करण्यात आली. खंडलायसह परिसरातील विद्यार्थ्यांकडून, नागरीक,ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.