जिद्द , चिकाटी व कष्टानेच यशाची प्राप्ती – शरद बोदडेयुवा भारत अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न…आतिक खान मुक्ताईनगर

जिद्द , चिकाटी व कष्टानेच यशाची प्राप्ती – शरद बोदडे
युवा भारत अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न…
आतिक खान मुक्ताईनगर

मुक्ताईनगर — आजच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धेत टिकण्यासाठी आपला आत्मविश्वास टिकविणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रमाची जोड हवी त्याशिवाय यशाची प्राप्ती होत नाही असे प्रतिपादन प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या शरद बोदडे यांनी मुक्ताईनगर येथे केले शहरातील नवीन गावातील स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या युवा भारत अकॅडमीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी श्री.बोदडे बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस युवाभारत अकॅडमी,मुक्ताईनगरचे मुख्य संचालक संतोष विकास सोनार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यात ते म्हणाले की , 2018 पासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी मुक्ताईनगर तालुक्यातील एकमेव अकॅडमी ही युवा भारत अकॅडमी आहे. अतिशय कमी कालावधीत या अकॅडमीचे विद्यार्थी यांनी
2023 महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये विद्यार्थी – आकाश रमेश सोळंके (मिरा-भाईंदर पोलीस), गणेश प्रकाश इंगळे (मुंबई पोलीस),सुनील बुलाखी इंगळे (मुंबई पोलीस),संजय पारधी (MSF मुंबई) , मिठाराम पावरा ( MSF मुंबई),अमोल खोसे (MSF मुंबई) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. इतकेच नाही तर सहा विद्यार्थी भारतीय सेना दलास सुद्धा सैनिक म्हणून सेवारत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. युवा भारत अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या आकाश सोळंके आणि संजय पारधी यांनी त्यांची मनोगते व्यक्त केली.त्यात त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून कशाप्रकारे यश संपादन केले ते कथन केले. त्यांना भारत युवा अकॅडमी चे संचालक संतोष सोनार तसेच सेवानिवृत्त बी.एस.एफ चे जवान तथा प्रशिक्षक रामू एस.मेढे सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांकडून कठोर परिश्रम करून घेतले त्यामुळे यश संपादन झाल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रशिक्षक रामू मेढे तसेच प्रफुल्ल मेढे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . याप्रसंगी रवींद्र कडू सोनार, .कालिदास कडू सोनार सर,.सुरेश भोई,.विकास जनार्दन सोनार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!