न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साक्री चे क्रीडा शिक्षक श्री बन्सीलाल संतोष बागुल यांना विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी साक्री संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साक्री चे क्रीडा शिक्षक श्री बन्सीलाल संतोष बागुल यांना 2023 चा विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. नुकत्याच दिनांक 14/ 5/ 2023 रोजी निकम फार्मसी महाविद्यालय गोंदूर येथे संपन्न झालेल्या राज्य क्रीडा शिक्षक महासंघ आणि निकम फार्मसी महाविद्यालया तर्फे आयोजित कार्यक्रमात नाशिक विभाग क्रीडाक्षेत्रातील एकूण 60 कोहिनुर हिऱ्यांना पुरस्कार देण्यात आले त्यापैकी धुळे जिल्ह्यातील 2023 चा विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक हा पुरस्कार श्री बन्सीलाल संतोष बागुल यांना धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. संजयजी बारकुंड साहेब यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. संजयजी बारकुंड, प्रा. रवींद्र निकम, क. ब. चौ. उ. म. वि. जळगावचे विद्यापीठ क्रीडा मंडळ सचिव डॉ. दिनेश पाटील, कैलास जैन, डॉ. आनंद पवार, संजय पाटील राजेश जाधव आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष दादासो. परागजी बेडसे, सचिव भैयासो.अनिलजी सोनवणे, विश्वस्त श्री भैय्यासो. ऍड. गजेंद्र भोसले, भाऊसो.श्री दिपकजी अहिरराव,दादासो.श्री संजू पाटील, आण्णासो.श्री उत्तमराव लकडू बोरसे तसेच व्यवस्थापक मंडळ सदस्य श्री लाला मोरे, माईसो. उज्वला बेडसे, ताईसो. सुनीता नाईक प्राचार्य श्री एस बी पाटील, उपप्राचार्या श्रीमती शिवदे मॅडम, उपमुख्याध्यापिका श्रीमती तारकेश्वरी निकम, पर्यवेक्षक श्री विलास गोसावी,पर्यवेक्षक श्री मुनंद करंजे आदींनी श्री बन्सीलाल संतोष बागुल यांचे अभिनंदन केले.