२०लाखाच्या घरात नोकरी करिता दैनंदिन प्रवास करणा-या महिला प्रवाशांच्या लोकल प्रवासातील समस्यांबाबत कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला प्रतिनिधींनी घेतली महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांची भेट —

२०लाखाच्या घरात नोकरी करिता दैनंदिन प्रवास करणा-या महिला प्रवाशांच्या लोकल प्रवासातील समस्यांबाबत कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला प्रतिनिधींनी घेतली महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांची भेट ———————————————————-ठाणे(गुरुनाथ तिरपणकर)-“महिला आयोग आपल्या दारी”अंतर्गत जनसुनावणी व शासकीय विभागांची आढावा बैठक महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्या उपस्थितीत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे,व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय,ठाणे येथे संपन्न झाली.या अनुषंगाने कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन त्यांना मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर लोकलने प्रवास करताना महिला प्रवाशांना येणा-या विविध अडचणी समस्यांचा पाढा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्यापुढे वाचला.संघटनेच्यावतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात महिला लोकल वाढवाव्यात,एसी लोकल ट्रेनचे तिकीट भाडे महिलांसाठी ५०%कमी करावे,कसारा कर्जत सर्व लोकल१५डब्यांची करुन महिला आरक्षित डब्यांची संस्था वाढवावी,महिलांच्या रेल्वे प्रवासात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आरपीएफ व जिआरपी पोलीसांची संस्था वाढवावी,महिलांकरीता शौचालय सारख्या मुलभुत सुविधा वाढवाव्यात,महिला डब्यात सिसिटिव्ही लावावेत व महिला पोलीस तैनात करावेत,प्रत्येक स्थानकात हिरकणी कक्ष सुरू करावेत,आदी मागण्या मांडण्यात आल्या.या शिष्टमंडळात संघटनेतर्फे सौ.आरती भोईर(कल्याण-कसारा महिला संघटक),सौ.रेखा अत्तरदे(कल्याण-कर्जत महिला संघटक)व महिला प्रतिनिधी सोनल गवांडे,प्रियांका गवांडे या उपस्थित होत्या. संघटनेच्या महिला पदाधिका-यांनी सादर केलेल्या निवेदनातील मुद्यांनवर ताबडतोब रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करुन त्याबात अंमलबजावणी करण्याचे तातडीने आदेश दीले जातील असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांनी आश्वासित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!