सेंद्रीय पद्धतीचा वापर करून शेतीमध्ये प्रयोग करत कापूस, सोयाबीन, केळी,टोमॅटो, डाळिंब, हळद, पपई, टरबूज, मिरची, मोसंबी अशी विविध पिके घेणार्‍या १६१ शेतकऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

जळगाव (खान्देश) जिल्ह्यातील बोदवड-मुक्ताईनगर परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेतकऱ्यांची मुलुख मैदान तोफ मा. राज्यमंत्री मा.रविकांत भाऊ तुपकर हस्ते बोदवड येथील सावरिया लॉन्स येथे शेतीरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. संचय अ‍ॅग्रो इनपुट्स, पुणे व खंडेलवाल ग्रुपच्या वतीने आयोजित या शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. रविकांत भाऊ तुपकर यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना संबोधित केले.

सेंद्रीय पद्धतीचा वापर करून शेतीमध्ये प्रयोग करत कापूस, सोयाबीन, केळी,टोमॅटो, डाळिंब, हळद, पपई, टरबूज, मिरची, मोसंबी अशी विविध पिके घेणार्‍या १६१ शेतकऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

सेंद्रीय उत्पादनांचा वापर केल्याने पिकांची पौष्टिकता व जमिनीचा पोत टिकून राहतो. या सर्व शेतकऱ्यांनी अशाप्रकारे शेती करून दर्जेदार असे पिक घेतले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांचे कौतुक करण्याच्या व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संचय अ‍ॅग्रो इनपुट्स, पुणे या कंपनीचे सर्वेसर्वा, श्री.सागर मंत्री यांनी या देखण्या सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात प्रयोगशील युवा शेतकऱ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. याप्रसंगी हजर राहून या शेतकर्‍यांना मा.रविकांत भाऊ तुपकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

शेतकर्‍यांच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे तसेच लाखो शेतकऱ्यांना जोडण्याचे काम १५ राज्यात ‘संचय’ करत आहे. ज्या प्रमाणे लहान बाळाच्या वाढीसाठी जशी पोषक घटक आवश्यक असतात तसेच पिकांच्या वाढीसाठीही अनेक घटकांची आवश्यकता असते. त्या सर्व घटकांची निर्मिती संचय अ‍ॅग्रो इनपुट्स ही कंपनी करते व अल्पावधीतच कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत राज्यभर अत्यंत प्रतिष्ठित कंपनी म्हणून ही कंपनी नावारूपाला आली आहे. श्री.सागरजी मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अनेक तरुण शेतकरी शेतीमध्ये वेग-वेगळे यशस्वी प्रयोग करत आहेत. याचे कौतुक वाटते…!

यावेळी श्री.अनिलशेठ खंडेलवाल, श्री.उद्धव सिरसाट, डॉ.यशपाल बडगुजर, श्री.सत्यनारायणजी खंडेलवाल, श्री.प्रकाश खाचने, श्री.हकीमसेठ बागवान, श्री.अनिल पाटील, श्री.भागवत वाघ, श्री.राहुल महाजन, श्री.श्रीकृष्ण कोल्हे, श्री.निलेश दिक्षीत, श्री.सुंदर मराठे यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवने, बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल राऊत, सचिन पाटील ,सैय्यद वसीम, निलेश नारखेडे, सचिन शिंगोटे, सतिष नवले यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!