खंडलाय बु येथे अहिल्याबाई होळकर जयंती निमित्ताने कार्यक्रम नेर: धुळे तालुक्यातील खंडलाय बु येथील दिनांक 31 मे 2023 रोजी पुण्यश्लोक, राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या 298 व्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय श्री बापुसो गोरख दला देवरे, बापुसो गुलाब बागुल,बापू पाटील, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि आदरणीय श्री भाऊसो भीमराव खंडू पाटील,यांच्या हस्ते माल्यार्पण करून आदरणीय श्री नानासो श्रीराम बागुल जेष्ठ ग्रा पं सदस्य, आण्णासो त्रंबक दला देवरे, यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले. आणि जयघोष करण्यात आले. ग्रामपंचायत चौकात प्रशस्त जागेवर प्रथम प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून, श्रीफळ फोडण्यात आले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अखिल भारतात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या, जगात एकमेव “तत्वज्ञानी महाराणी” म्हणून गाजलेल्या, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींची 298 वी जयंती संपूर्ण जगात आणि देशात धूमधडक्यात साजरी झाली आहे. या पुण्यश्लोक राजमातेचा जयंती उत्सव यावर्षी त्यांच्या दैदीप्यमान कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आजच्या स्त्री मध्ये ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून गावागावात साजरा झाला आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेविंच्या नावाने खंडलाय बु ता जि धुळे ग्रामपंचायतच्या वतीने प्रथम सन्मानपत्र श्रीमती. फुमाबाई पुंडलिक पाटील ( ग्रा पं सदस्या ) यांना आदरणीय श्री भाऊसो भीमराव खंडू पाटील ( आदर्श शेतकरी ) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच द्वितीय सन्मानपत्र श्रीमती मंगलबाई पगारे ( आशा सेविका ) यांना आदरणीय माजी उपसरपंच श्री दादासो सदाशिव दगा बागुल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आपल्याच गावातील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान म्हणून शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, 500/- रुपये रोख देऊन पुरस्कार दिला गेला. यांच महिला आपले काम अत्यन्त जबाबदारीने चोख पद्धतीने पार करण्यात पारंगत आहेत, बऱ्याच स्रियांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम देखील राबवत असतं. तरी गावातील सर्व बहुजन बांधवांनी आपापल्या परीने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच गावात मध्यवर्ती भागात होणाऱ्या “जयंती उत्सवात” सर्वांनी पक्ष, गट, तट विसरून सहपरिवार सहभागी झालेत. तसेच इतर जातीधर्मातील आपला मित्र परिवार सोबतीला घेऊन पुण्यश्लोक राजमातेचे कार्य घरघरात पोहचावे म्हणून प्रबोधनाचा लाभही ग्रामस्थांनी मोठया संख्येने घेतला.
कार्यक्रम स्थळी गटप्रमुख आबा पगारे, सरपंच, उपसरपंच, सदस्य, युवामित्र तसेच आनंदा पाटील, दादाभाऊ कोळी, नारायण माळी, भूषण देवरे, अर्जुन मासुळे, दिलीप देवरे, योगेश पाटील, यशवंत नाना, संदीप देवरे, कपिल मासुळे, भैय्या देवरे, भिका पाटील, आजी – माजी पदाधिकारी, ग्रामसेवक सतिष शिंदे, अविनाश खलाने, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका इ उपस्थित होते.