अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे तर्फे कार्याध्यक्षपदी आबा पगारे यांची निवड:
नेर: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे तर्फे कार्याध्यक्षपदी आबा पगारे यांची निवड यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशाने, आदरणीय नाशिक विभागीय अध्यक्ष श्री बाळासाहेब कर्डक, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आदरणीय अनिलजी नळे, जिल्हा सरचिटणीस आदरणीय बापूसाहेब महाजन, जेष्ठ सल्लागार प्रा. आदरणीय आण्णा माळीसर, जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री. राजेशजी बागुल, नंदुरबार जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेंद्र वाघ, महानगर प्रमुख आदरणीय गोपाल देवरे, माळी महासंघ विभागीय अध्यक्ष आदरणीय श्री प्रा. अनिलजी बोरसे, आदरणीय बापूजी माळीसाहेब, सर्व बहुजन पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साने गुरुजी जेष्ठ नागरिक भवन शिवतीर्थ धुळे येथे युवामित्र, सर्वांचे लाडके सन्मित्र, स्पष्टवक्ते, राजा माणूस श्री. आबासो.भटू बळीराम पगारे खंडलाय बु. ता जि धुळे यांच्या निवडीची घोषणा करून नियुक्तीपत्र बहाल केलं. आता संपूर्ण कार्याध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी श्री. आबासो. भटू बळीराम पगारे यांच्या खांद्यावर आली आहे. ती जबाबदारी ते सक्षमपणे पेलतीलच आणि समता परिषदेचा विस्तार गावोगावी करतील.
धुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सर्वच क्षेत्रातील मान्यवर त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्ष्यावं टाकत आहेत. ते एक धडाडीचे, अभ्यासू, कुशाग्र बुद्धीचे, विश्वासूं नेतृत्व करणारे खंडलाय बु ग्रामपंचायत गटप्रमुख देखील जबाबदारी पेलत आहेत. तसेच त्यांच्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, युवामित्र तथा ग्रामस्थ यांनीही शुभेच्छा दिल्यात.
अखिल भारतीय समता परिषदेच्या माध्यमातून बहुजन समाजाला एक नवीन दिशा प्रदान कराल, तसेच परिषदेच्या वतीने राबवल्या जाणार्या सामाजिक कार्यासाठी आपण तत्पर अग्रेसर राहून, आपल्याला क्रांतिसूर्य, तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांचा खरा इतिहास तसेच समाजासाठी वेळोवेळी राबवले जाणारे व बहूजण समाजातील जन- सामान्यांपर्यंत आपण पोहंचवाल या अपेक्षेसह…आम्ही आपणास पुढील कार्य पार पडण्याची ऊर्जा देतो व यापुढील सर्व सामाजिक कार्यास प्रश्नासाठी आपण सतत सक्रिय राहावे. आणि आपल्या कार्याध्यक्ष पदाचा कार्यारंभास, पुढील कामासाठी मनस्वी शुभेच्छा देण्यात येत आहेत.