न .का. वराडकर बेलोसे कॉलेज चे प्राध्यापक धर्मा कोळी सेवा निवृत्त
दापोली दापोली तालक्यातील अनेकांना शिक्षणाची दालन न .का. वराडकर बेलोसे महाविद्यालयाने खुली करून दिली आहे, या प्रसिद्ध कॉलेजमध्ये 32 वर्ष अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे प्राध्यापक धर्मा कोळी प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर न.का. वराडकर आणि बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य सहकारी प्राध्यापक या मंडळीने त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राध्यापक धर्मा कोळी यांचे मोलाचे योगदान होते, विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र शिक्षणाबरोबरच ग्रामीण समाज जीवन बदलती परिस्थिती, समाजाची दशा व दिशा या विषयावर अनेक वेळा ते चर्चासत्र घडवून आणत, 2010 पासून अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते. एन एस एस विभाग ,परीक्षा विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सांभाळले होते.
बाळशास्त्री जांभेकर शोध निबंध, महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती, नेहरू युवा केंद्र रत्नागिरी, या पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता. तसेच अनेक कथांचे राज्यस्तरीय बक्षीसही त्यांना मिळाले होते, त्यांच्या 32 वर्षाच्या सेवेत कॉलेजला चांगला फायदा झाला.
प्राध्यापक धर्मा कोळी यांनी काही काळ प्रभारी प्राचार्य पदही भूषविले होते,तसेच उप प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले होते. कोळी सर विद्यार्थ्यांचे आवडते गुरु होते ,आपल्या मनमिळाऊ स्वभावाने ते सहकारी प्राध्यापकांनाही तितके जवळचे वाटत होते. संस्थाचालकांच्या विश्वासातील व्यक्तींपैकी ते एक होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलायची असेल तर त्यांनी शिक्षण घेतले पाहिजे. एखादी विद्यार्थ्याला शैक्षणिक अडचण असेल तर त्यांनी व्यक्त झाले पाहिजे. समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही, असे ते नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असत .एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कार्यानुभवाचे मोलाचे धडे कोळी सर गेले अनेक वर्ष देत आले होते. सामान्यतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाबरोबरच मोलाचे सहकार्य करणारे प्राध्यापक कोळी सर सेवा निवृत्त झाले आहेत.त्यामुळे कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागात पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी कोळी सरांसारखा तितकाच धाडसी मनमिळावू प्राध्यापक मिळणे गरजेचे आहे तरच कॉलेजचा अर्थशास्त्र विभाग पुन्हा भक्कमपणे उभा राहिल , कॉलेजची प्रगती होत राहील, कॉलेजच्या जडणघडणीत कोळी सरांचा मोलाचा वाटा आहे , सेवानिवृत्तीनंतर पालक विद्यार्थी व कॉलेज यांना त्यांची उणीव कायम जाणवत राहील .