आदिवासी कमिटीचे स्तुत्य कार्य
आदिवासी बांधवांनी श्रमदानातून घर बांधले
आदिवासी कमिटीचे स्तुत्य कार्य
दापोली:कांगवई गांवातील शांताराम वाघमारे आदिवासी बांधवांचे घराला अचानक आग लागली होती. ते घर कांगवई आदिवासी विकास विभाग कमिटीने स्वतः श्रमदान करुन तयार करुन दिले .या कामात आदिवासी कमिटीचे अध्यक्ष शांताराम जाधव ,उपाध्यक्ष अशोक पवार ,सचिव काळूराम वाघमारे ,माल्या जाधव ,मधूकर वाघमारे ,नारायण पवार ,अशोक दा पवार, किरण पवार ,रामजी वाघमारे ,रमेश वाघमारे, सदानंद वाघमारे, महादेव मूकणे ,रमेश पवार ,अकूंश पवार ,दिपक वाघमारे ,अविनाश निकम ,अनंत पवार , घरमालक शांताराम वाघमारे ,रोहिदास पवार व इतर काही कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
शांताराम वाघमारे यांना पुन्हा आपले घर बांधून मिळाले,म्हणून त्यांना अत्यंत आनंद झाला आहे. आदिवासी जात बांधवांच्या मदतीने शांताराम वाघमारे यांना निवारा मिळाला आहे. घरमालक शांताराम वाघमारे यांनी आदिवासी कमिटीचे आभार मानले आहेत. आदिवासी बांधवांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.