शहादा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 75 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. —- शहादा–३–शहादा येथील शहादा महामंडळाच्या बस स्थानकात शहादा तालुका प्रवासी महासंघ व लोकमान्य जेष्ठ नागरिक मंडळातर्फे म.रा.प.म.ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात पहिली बस सेवा १/६/१९४८रोजी सुरू झाली. त्याच सेवेसाठी पहिले वाहक म्हणून स्व. लक्ष्मणराव केवटे अहमदनगर यांनी सेवा सुरू केली. यावेळी शहादा आगारातील निवृत्त झालेल्या सेवकांच्या तसेच शहादा आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे स्वागत व सत्कार गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा तालुका महासंघाचे अध्यक्ष प्रा.सुनील सोमवंशी तालुका संघटक के.डी. गिरासे सदस्य के.के सोनार दिलीप खेडकर बापूराव कोळी फरीद पठाण प्रा जगदाळे शाकीर ईसाणी आशा रावल यांचे सह शहादा आगारातील सहा. निरीक्षक एस.टी. वाडीले,भरत पवार सहा.अधीक्षक, विलास पाटील वरिष्ठ लिपिक,देविदास पवार लेखापाल, योगेश धनगर लिपिक, जागृती राठोड लिपिका, सतीश चव्हाण लिपिक, शरीफ पिंजारी लिपीक आदी उपस्थित होते एसटी बसचे प्रथम व चार वाहक स्व.लक्षणराव केवटे अहमदनगर यांना प्रथम श्रध्दांजली वाहिली.नंतर शहादा आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी कंट्रोलर बी ए पाटील,वाहक संजय गिरासे, ठाकरे तसेच चालक आर.पी. गिरासे आर.बी. गिरासे, नंदलाल शिरसाठ आणि शिपाई अशोक पावरा यांच्या तसेच शहादा आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पन्न देणारा आणि महामंडळाच्या 20 परीमानांचे (मुद्दे) व्यवस्थितपणे पार पाडणारा तसेच आठ महत्त्वाच्या परिमाणांच्या निर्देश पाळणारा शहादा शहादा आगार असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शहादा आगाराला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला म्हणून शहादा शहर व शहादा तालुक्यातील प्रवाशांनी शहादा आजाराचे अभिनंदन केले तसेच यापुढेही अशीच भरभराटीची प्रगती होईलच अशी ग्वाही प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनी दिली. शहादा आगाराकडून चांगल्या प्रकारे सेवा मिळत असल्यामुळे प्रवाशांकडून कौतुक केले. विशेषता महिलांनी प्रवास भाड्यात सवलत मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री तसेच महामंडळाचे आभार व्यक्त केलेत.नवीन बसेस मिळाव्यात अशी अपेक्षाही प्रवाशांनी व्यक्त केली. यां कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी तर आभार प्रदर्शन के.डी. गिरासे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरिते पार पाडण्यासाठी सतीश चव्हाण व शरीफ पिंजारी यांनी परिश्रम घेतलेत.
आपला स्नेही
श्री.के. डी. गिरासे. शहादा जि नंदुरबार