शहाद्यात दोन गटात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन
प्रतिनिधी प्रभू नाईक शहादा
-शहादा शहरात शुक्रवारी रात्री दोन गटात झालेल्या वादात शहरात तणाव पूर्ण शांतता असून भितीचे वातावरण आहे पोलिसांचा बंदोबस्त कायम असून वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी समाजकंटकांवर कारवाईचे सत्र सुरू ठेवले आहे. शहरातून पोलिसांचे सशस्त्र पथसंचलन करण्यात आले.
शहादा शहरात रात्री क्रिकेट खेळण्याचा वादातून दोन गटात वाद झाला होता या दोन तरुण जखमी झाले होते जखमी तरुणांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका गटातील तरुणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते मात्र पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे चुकीचे आहेत त्यात घटनेची संबंधित नसलेल्या लोकांची नावे असल्याचे सांगत एक गट दुपारी अचानक रस्त्यावर उतरल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या मनातील भिती दूर व्हावी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा; या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने शहादा शहरात विशेषतः महत्वाचे भागात पोलीसांनी सशस्त्र संचलन केले. सचलनाचे नेतृत्व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले. अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार तसेच राज्य राखीव पोलीस बलाचे जवान सहभागी झाले होते.