एस्.के ज् प्रस्तुत’म्युझिक मंत्रा’आयोजित “महाराष्ट्राची स्वरगाथा”या संगितमय कार्यक्रमात विविध सामाजिक पदाधिका-यांची उपस्थिती

एस्.के ज् प्रस्तुत’म्युझिक मंत्रा’आयोजित “महाराष्ट्राची स्वरगाथा”या संगितमय कार्यक्रमात विविध सामाजिक पदाधिका-यांची उपस्थिती ———————————————————-डोंबिवली-शर्मिला केसरकर या सामाजिक क्षेत्रात काम करणा-या महीला.तसेच डोंबिवली सांस्कृतिक विभागाच्या भाजप शहर अध्यक्षा.त्या एस्.के जे प्रस्तुत’म्युझिक मंत्रा’हा ऑर्केस्ट्रा गेली १५वर्षे वेगवेगळ्या शहरात सादर करत आहेत.त्याच अनुषंगाने नुकताच डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात”महाराष्ट्र स्वरगाथा”हा मराठी गीतांचा सदा बहार संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमात मराठी गाणी,लावणी,नृत्य,असे विविध अविष्कार व वेशभूषा सादर करण्यात आल्या.याप्रसंगी महिला उत्कर्ष समितीच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षा श्रुती उरणकर,विकास संकल्प सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका गवंडे,जीवन रेखा फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेखा मोरे,आदर्श ह्युमन राईट फाऊंडेशनच्या ठाणे जिल्हा सचिव ज्योती नाईक,ओबीसी महिला मोर्चाच्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव विजया जाधव,हेल्पींग हॅन्ड ट्रस्टच्या पीआरओ ज्योती पाटील,जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सर्व उपस्थित मान्यवरांचा शर्मिला केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.महाराष्ट्राची स्वरगाथा या म्युझिक मंत्राच्या कार्यक्रमात ईश्वर सोलंकी,सचिन,हरीश,संदेश पाटील,गणेश मांजरेकर,जाहिद शेख,अरविंद सुर्वे,संगीता,रोहिणी,स्वाती,परिमाला,दत्तात्रय,राजेंद्र,धनंजय,संजय,अतुल या गायक-गायिका,तंत्रज्ञ व इतर सहका-यांच्या विशेष सहभागाने कार्यक्रम यशस्वी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!