तालुक्यात चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानी बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा मार्फत दिले निवेदन शहादा तालुक्यात चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानी बाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील,डॉकटर सुरेश नाईक,अरविंद कुवर यांनी तहसीलदार याच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनाचा आशय असा ,रविवार दि. ४ रोजी संपुर्ण शहादा तालुक्यात चक्री वादळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यात काही ठिकाणी हव्या सोबत पाउससुध्दा झाला आहे. तालुक्यातील शेतकरी बांधव येत्या खरीपाच्या हंगामाच्या तयारीत होता. अचानक उदभवलेल्या परिस्थितीमुळे परीसरातील शेतकरी व नागरीकांची तारांबळ उडुन मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तालुक्यात केली पिकाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतले जात असते. केळी हे पिक कापणी योग्य इ आले होते. या वादळी वाऱ्यामुळे सर्वात जास्त नुकसान या शेतकऱ्यांचे झाल आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.
सोबतच येत्या हंगामासाठी परीसरातील बहुतांश पपई उत्पादक शेतकऱ्यानी माहे एप्रील मध्ये पपईची लागवड केली होती. सदर लागवड केलेल्या पपईचे या वादळी वाऱ्यामुळे पावसामुळे पपईची झाले कोलमडली आहेत.
शहादा तालुक्यात या रब्बी हंगामातील बाजरी या शेतीमालाची कापणी मळणी सुरू होती. अकस्मात आलेल्या वादळी वान्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या वादळामुळे तालुक्यात धन्याचठिकाणी काल सकाळ पासुन विज झाला असून विजेचे खांब व तारा जमीनीवर पडल्या आहेत. शेतीसाठी लागणारा विज पुरवठा बंद आहे.
रविवारच्या या झालेल्या जोरदार वादळामुळे परीसरातील बऱ्याच घराचे नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडाले आहेत. तालुक्यातील शेतकरी व नागरीकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहेत. तरी आपणास नम्र विनंती की, नुकसानग्रस्त भागातील शेतकरी/ नागरीकांचे पंचनामे त्वरीत सुरू करण्यात येवून शासन दरबारी शेतक-यांना / नागरीकांना मदत मिळावी
तसेच कापणीयोग्य झालेल्या केळी या फळपिकाचे बऱ्याच शेतकरी बंधुनी पिक विमा योजनेत सहभाग झेतला आहे. तरी संबंधीत विभागास याबाबत सुचना देवून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवानां विमा रक्कम मिळवून देणेबाबत सूचना वजा आदेश द्यावे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी सह शेतकरी उपस्थित होते.