थेट मंत्रालयातील कक्ष अधिकारी यांना शासनाने कारणे दाखवा नोटिस देऊन खुलासाची मागणी केली त्यानंतर होणार विभागीय चौकशी ! वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती देण्याचे आदेश देऊन हि माहिती न दिल्याबद्दल व अमंलबजावणी न करता वरिष्ठांची आदेशाची अवहेलना केल्याबद्दल होणार शिस्तभंगाची कारवाई.
मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय केंद्रबिंदू असणारे मंत्रालय, मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,मंत्रालय, मुंबईचे अनिल चौरे, तत्कालिन कक्ष अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी, वैसेवा-१ यांना मं.कि.बागल, कक्ष अधिकारी, (आस्थापना विभाग) महाराष्ट्र शासनाने दिले कारणे दाखवा नोटिस ( show cause notice) देऊन ७ दिवसात खुलासाची मागणी केली आहे. खुलासा नंतर अनिल चौरे, जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांची विभागीय चौकशी/शिस्तभंगाची कारवाई होण्याचे संकेत दिले आहे
सदरची मंत्रालयातील अधिकाऱ्यावर कारवाई होण्याचे प्रमुख कारण असे आहे की, दिनेशसिंग शितल यांनी
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ. वैशपांयन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर चे तत्कालिन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, डॉ. शुभलक्ष्मी जयस्वाल व प्रशासकीय अधिकारी श्री. समाधान जामकर व वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन केंद्र मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी श्री विष्णू कामडी व इतरांची शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी तक्रारकर्ता दिनेशसिंग शितल यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री श्री. उध्वजी ठाकरे, तत्कालिन राज्यपाल श्री. भगतसिंग कौश्यारी व तत्कालिन प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे लेखीतक्रार केली होती.
सदर अर्जावर कोणतीही समाधानकारक कारवाई करण्यात आलेली नाही. त्यासंबधातील विषयक माहिती मिळण्यासाठी ४ वेगवेळे अर्ज दाखल करुन माहितीची मागणी केली होती. त्यावर सुध्दा कोणतीच माहिती मिळाली नसल्यामुळे अपिलकर्ता
यांनी दि. २९-६-२०२२, दि. ५-७-२०२२, दि. २७-७-२०२२, दि.६-७-२०२२ रोजीच्या प्रथम अपिल अर्जावर सह सचिव तथा अपिलीय प्राधिकारी (वैसेवा-१) यांनी सुनावणी घेऊन अनुक्रमे दि. १५-७-२०२२, दि. १०-८-२०२२, दि.१२-९-२०२२, दि. १०-८-२०२२ रोजी आदेश पारित केले होते.
सुनावण्याच्या वेळेस अनिल चौरे, तत्कालिन जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी, वैसेवा-१ यांना माहिती देण्याबाबत सहसचिव तथा प्रथम अपिलीय प्राधिकारी (वैसेवा- १) यांनी निदेश दिले होते. सदर निदेशास अनुसरुन कोणतीही कार्यवाही
केलेली नाही. त्यामुळे अपिलार्थीनी पुन्ह: सदर निर्णयाच्या अनुषंगाने माहिती अर्ज केले आहेत. त्यावर देखील माहिती न मिळाल्याने त्यांनी पुन्हा ४ अपिले दाखल केली आहेत. सदर अपिलावर दि. १६-५-२०२३ रोजी सुनावणी घेऊन सहसचिव तथा
प्रथम अपिलीय प्राधिकारी (वैसेवा- १ ) यांनी निर्णय दिले आहेत. परंतु आपण यापूर्वीच्या प्रथम अपिलात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अपिलार्थी यांना माहिती दिली असती तर याबाबी पुन्हा उपस्थित झाल्या नसत्या.
तसेच आदेशाचे पालन न केल्यामुळे कार्यालयीन कामकाजाप्रती निष्ठा न दिसता बेजबाबदारपणा दिसून येतो. सबब सह सचिव तथा प्रथम अपिलीय प्राधिकारी (वैसेवा-१) यांच्या उपरोक्त आदेशाप्रामणे का कार्यवाही करण्यात आलेली नाही याबाबतचा खुलासा ७ दिवसात आस्थापना कार्यासनास सादर करण्यात यावा. विहित कालावधीत सदर खुलासा प्राप्त न
झाल्यास आपणास काहीही म्हणणे सादर करावयाचे नाही असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येइल याची नोंद घ्यावी म्हणून ज्ञापन निर्गमित झाले आहे.
अनिल चौरे, तत्कालिन कक्ष अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी, वैसेवा-१ यांच्यावर कारवाई होणकामी तक्रारकर्ता दिनेशसिंग शितल यांनी श्री. शिवाजी पाटणकर, सहसचिव तथ प्रथम अपिलीय प्राधिकारी, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांना निवेदन दिले होते त्या अनुषंगाने श्री. पाटणकर, सहसचिव यांनी प्रधान सचिव यांना शिफारस आणि आस्थापना विभाग यांना आदेश दिले होते तसेच डॉ. अश्विनी जोशी, प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने सदर कारवाई होत आहे.