माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालय नंदुरबार येथे उद्घाटन व कार्यकर्ता प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न…

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालय नंदुरबार येथे उद्घाटन व कार्यकर्ता प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न…

नंदुरबार/प्रतिनिधी

    माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे नंदुरबार येथे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर सर यांचा हस्ते व राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन यांचे नेतूत्वखाली कार्यालयांचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर माहितीच्या अधिकार बद्दल बोलताना सांगितले की,प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करणे, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी याकरिता नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराची व्यवहारी शासन पद्धत दाखवून देणे, केंद्रीय व राज्य माहिती आयोग स्थापन करणे इतर अनुषंगिक बाबी सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामात पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगत करणे, भ्रष्टाचारास प्रतिबंध करणे, लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे, शासन व त्यांच्या यंत्रणा यांना जनतेला जाब देण्यासाठी उत्तरदायी ठरविणे, माहिती मिळवण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना विशिष्ट माहिती पुरवण्याकरता तरतूद प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करणे, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी याकरिता नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराची व्यवहारी शासन पद्धत दाखवून देणे, केंद्रीय व राज्य माहिती आयोग स्थापन करणे इतर अनुषंगिक बाबी सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामात पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगत करणे, भ्रष्टाचारास प्रतिबंध करणे, लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे, शासन व त्यांच्या यंत्रणा यांना जनतेला जाब देण्यासाठी उत्तरदायी ठरविणे, माहिती मिळवण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना विशिष्ट माहिती पुरवण्याकरता तरतूद करणे अशाप्रकारे अनेक माहिती अधिकार कायदा व कलमां बद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वाहतूक नियंत्रण कक्षाचे उप निरीक्षक संजय जोने साहेब वाहतुक अधिकारी नितीन परदेशी, वन विभागाचे अधिकारी प्रवीण कांतीलाल परदेशी साहेब, नगर पालिकेचे अल्ताफ शेख, माजी नगर सेवक न.पा. रामकृष्ण शंकर मोरे, दो शाह ब्लड बँक फौंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आकीब शेख सर, संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमसिंग लक्ष्मण वळवी, सौ. लताताई भीमसिंग वळवी, रोहिदास सोन्या गावित, आदी उपस्थित होते.
नंदुरबार,शहादा,तळोदा,नवापूर, अक्कलकुव्वा, धडगाव, ठिकाणाहून आलेले महासंघाचे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आलेले
प्रमुख पाहुण्यांच्या व कार्यक्रमाचे अध्यक्ष वळवी साहेब यांचे उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर सर यांचे हस्ते फीत कापून महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सईद कुरेशी यांनी केले तर आभारप्रदर्शन जयेश आबा बागुल यांनी केले.
कार्यक्रमाला संघटनेचेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!