आदीवासी टोकरे जमातीची लेक डॉ.प्रियंका झाली एमबीबीएस:
नेर: शिंदखेडा तालुक्यातील छोटेशे रंजाणे गावातील अभिलाष हसरत सावळे यांची सुकन्या डॉ.प्रिंयका सावळे हिने MBBS उतीर्ण होऊन आपल्या गावाचे व परिवाराचे नाव लौकीक केले आहे.
प्रिंयकाने मुंबई सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकिय कॉलेज मध्ये MBBS चे शिक्षण पुर्ण केले.
वडिल श्री.अभिलाष हसरत सावळे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळात नौकरीला आहेत त्यांनी आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याचे ठरवीले प्रिंयका लहान पणापासुनच हुशार असल्याने प्रत्येक वर्गात प्रथम क्रंमाकाने पास होत होती, MBBS उतीर्ण होऊन प्रियंकाने आपल्या आई वडिलांचे स्वप्न पुर्ण केले आहे अगदी कमी वयात मोठे यश डॉ.प्रियंकाने मिळवले आहे.
मुलगी शिकली प्रगती झाली हे फक्त बोलण्या इतपत नाही तर मुली प्रत्यक्ष शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत प्रभावीपणे यश प्राप्त करीत आहेत हे डॉ.प्रियंकाच्या यशातुन दिसुन येतय.
आदीवासी टोकरे कोळी जमातीत खुप कमी प्रमाणात मुली MBBS होतांना दिसतात पंरतु डॉ.प्रियंकाने आपल्या मेहनीतीने या यशापर्यंत पोहचत वेगळी ओळख निर्माण केली असून डॉ.प्रियंका चे रंजाने गावातून व परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.