आरती भोईर यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

आरती भोईर यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान ———————————————-‐———-वासिंद(गुरुनाथ तिरपणकर)-सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या तसेच कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला संघटक आरती ताई भोईर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ६जुन२०२३रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.वाशिंद ग्राम पंचायतीने आरती ताई भोईर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वाशिंद ग्राम पंचायत कार्यालयात ग्रामविस्तार अधिकारी श्री.सुर्यकांत वीरकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल आरती ताई भोईर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!